close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ऋषभ पंतची शेवटच्या क्षणी निवड, या खेळाडूला मिळणार होती संधी

भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Jul 19, 2018, 09:05 PM IST
ऋषभ पंतची शेवटच्या क्षणी निवड, या खेळाडूला मिळणार होती संधी

लंडन : भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या तीन टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. भारतीय टीममध्ये ऋषभ पंतची दुसरा विकेट कीपर म्हणून निवड करण्यात आली आहे. ऋषभ पंतबरोबरच दिनेश कार्तिक हा विकेट कीपर देखील भारतीय टीममध्ये आहे. पण ऋषभ पंतची निवड अगदी शेवटच्या क्षणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऋद्धीमान सहाची भारतीय टीममध्ये निवड होणार होती. पण आधीच बोटाच्या दुखापत झालेल्या सहाला बंगळुरूमधल्या राष्ट्रीय क्रिकेट अॅकेडमीमध्ये (एनसीए) आणखी एक दुखापत झाली. एनसीएमध्ये सराव करत असताना सहाच्या खांद्याला दुखापत झाली आहे.

एनसीएमध्ये व्यायाम करताना सहाच्या खांद्याला दुखापत झाली. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे सहा अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टलाही मुकला होता. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी सहा फिट होईल, असं बोललं जात होतं. पण पुन्हा दुखापत झाल्यामुळे सहाची निवड झाली नाही.

आयपीएलमध्ये ऋषभ पंतची जबरदस्त कामगिरी

आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळताना ऋषभ पंतनं जबरदस्त कामगिरी केली होती. आयपीएलच्या एका मोसमात पंतनं ६८४ रन केल्या होत्या. आयपीएलच्या एका मोसमात  याआधी कोणीही एवढ्या रन केल्या नाहीत. आयपीएलच्या एका मोसमात पंतनं ३७ सिक्स आणि ६८ फोर अशा एकूण १०५ बाऊंड्री मारल्या होत्या. एका मोसमात १०० पेक्षा जास्त बाऊंड्री मारणारा पंत दुसरा भारतीय आणि चौथा आयपीएल खेळाडू बनला आहे.