Rohit Sharma : रोहितला शाहीनची भीती वाटते...; माजी खेळाडूच्या वक्तव्याने एकच खळबळ

Rohit Sharma : स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा सामना करताना रोहितला भीती वाटते. आणि रोहितच्या ( Rohit Sharma ) मनात शाहीनची भिती कायम आहे, असं माजी खेळाडूचं म्हणणं आहे.

सुरभि जगदीश | Updated: Sep 8, 2023, 08:41 AM IST
Rohit Sharma : रोहितला शाहीनची भीती वाटते...; माजी खेळाडूच्या वक्तव्याने एकच खळबळ title=

Rohit Sharma : येत्या 10 सप्टेंबर रोजी आशिया कपमध्ये ( Asia cup 2023 ) पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान टीम आमने-सामने येणार आहेत. श्रीलंकेच्या क्रिकेट मैदानावर हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. आशिया कपमधील ( Asia cup 2023 ) यापूर्वी झालेला भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दरम्यान रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) ने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर ( Rohit Sharma ) जोरदार टीका केली आहे. 

शोएब अख्तरच्या म्हणण्यानुसार, स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा सामना करताना रोहितला भीती वाटते. आणि रोहितच्या ( Rohit Sharma ) मनात शाहीनची भिती कायम आहे. आशिया कप 2023 च्या ग्रुप स्टेजमध्ये रोहितला शाहीनने क्लीन बोल्ड केलं होतं. भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामना पावसामुळे रद्द झाला. पण सुपर-4 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 10 सप्टेंबरला सामना होणार आहे. त्यावेळी पुन्हा एकदा रोहित ( Rohit Sharma ) आणि शाहीन आमनेसामने येणार आहेत. 

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने स्टार स्पोर्ट्सच्या एका शोमध्ये सांगितलं की, “हा रोहित शर्मा तो रोहित शर्मा नाहीये. हा त्याचा स्टंट डबल आहे. शाहीनने रोहितच्या ( Rohit Sharma ) डोक्यात आपली जागा निर्माण केलीये. रोहितला भूमिका बदलताना मी कधीच पाहिलं नाही, पण तिथे ते काय होतं? त्याने ते बदलून ठळक केले. शाहीनच्या गोलंदाजीची रोहित शर्माने ( Rohit Sharma ) धास्ती घेतलीये. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांचं खेळाडूंवर असंच दडपण येतं.”

ग्रुप स्टेजमध्ये शाहीनने घेतली रोहितची विकेट

आशिया कप 2023 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान ग्रुप स्टेजमधील सामना 2 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला होता. पावसामुळे हा सामना रद्द केला गेला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली. मात्र यावेळी टीमची टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळली. शाहीनने त्याच्या उत्तम गोलंदाजीने विराट कोहली आणि रोहित शर्मासह ( Rohit Sharma ) एकूण 4 विकेट्स घेतले. त्या सामन्यात ज्या पद्धतीने शाहीनने रोहितची विकेट काढली त्यावरून त्याच्या गोलंदाजीचं खूप कौतुक केलं जातंय.

पुन्हा आमने-सामने येणार रोहित-शाहीन

भारत आणि पाकिस्तानने एशिया कपच्या सुपर-4 मध्ये आपले स्थान निश्चित केलंय. येत्या 10 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये होणार्‍या आशिया कपमध्ये दोन्ही टीम्स पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. म्हणजेच पुन्हा एकदा शाहीन आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांचा सामना होताना दिसणार आहेत. या सामन्यामध्ये रोहित गेल्या सामन्यात घेतलेल्या विकेटचा बदला घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.