मुंबई : वेस्ट इंडिजला टी-20 सिरीजमध्ये क्लीन स्विप देण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. या सिरीजची आज तिसरी आणि शेवटीची टी-20 मॅच रंगणार आहे. गेल्या सामन्यात झालेल्या चुका टाळण्याचा पूर्ण प्रयत्न रोहित करणार असून काही बदल यावेळी टीममध्ये करण्यात येणार आहेत.
तिसऱ्या टी-20 सामन्यातून विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना आराम देण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी टीममध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यातच सिरीज जिंकल्यामुळे रोहित शर्मा युवा खेळाडूंना संधी देऊ शकतो.
वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या गेल्या 2 टी-20 सामन्यात रोहित शर्माने इशान किशनला ओपनिंगला उतरवलं होतं. मात्र इशान ओपनिंगला उतरून साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्याने 2 सामन्यात केवळ 37 रन्स केलेत. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात ओपनिंग जोडी बदलू शकते. यामध्ये इशानला बसवून ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता आहे.
विराट कोहली तिसऱ्या सामन्यात अनुपस्थितीत असल्याने त्याच्या जागी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पर्याय म्हणून उतरवण्यात येईल. वनडेमध्ये श्रेयसने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये श्रेयसच समावेश केला जाईल.
तिसऱ्या सामन्यात अजून एक बदल केला जाण्याची शक्यता आहे. शार्दूलचं टीमइंडियामध्ये कमबॅक होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये दीपक चाहरला (Deepak Chahar) संधी देण्यात आली होती. मात्र त्याला दोन सामन्यांमध्ये केवळ एकच विकेट काढता आली. त्यामुळे आजच्या सामन्यात दिपकऐवजी शार्दूलाला संधी मिळू शकते.