ज्युनिअर कैफने जिंकले सचिनचे मन...

खुद्द क्रिकेटच्या देवाकडून स्वतःचे कौतुक ऐकण्यासाठी अनेक क्रिकेटर उत्सुक असतील.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 30, 2017, 09:10 AM IST
ज्युनिअर कैफने जिंकले सचिनचे मन... title=

नवी दिल्ली : खुद्द क्रिकेटच्या देवाकडून स्वतःचे कौतुक ऐकण्यासाठी अनेक क्रिकेटर उत्सुक असतील. आणि सचिन देखील खेळाला आणि खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देत असतो. यावेळेस सचिनचे मन ज्युनिअर कैफने जिंकले आहे. 

सचिनने शेअर केला व्हिडिओ

सचिनने इंस्टाग्रामवर मोहम्मद कैफच्या मुलाचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तो अतिशय सुरेख कव्हर ड्राईव्ह खेळताना दिसत आहे. त्याचे कौतुक करताना सचिन म्हणाला, कव्हरसाठी किती सुरेख शॉट मारत आहे. खूप छान. खेळ असाच सुरू ठेव.

 मोहम्मद कैफचा मुलगा

या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की, मोहम्मद कैफचा मुलगा बॉलिंग मशीनचा सामना करत आहे. ज्युनिअर कैफने व्हर्चुअल मशीनच्या साहाय्याने करत असलेल्या शानदार बॅटींगने सचिनचे मन जिंकले. मोहम्मद कैफ हा भारतीय संघाचा उत्तम बॉलर होता आणि त्याची फिल्डिंग अजूनही लोकांच्या लक्षात आहे.