Salman Batt On Hardik Pandya: टी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंडच्या (NZ vs IND) दौऱ्यावर आहे. भारताचे नवे छावे सेमीफायनलमधून बाहेर पडलेल्या न्यूझीलंडच्या तगड्या संघाविरुद्घ भिडणार आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) संघाची कमाल सांभाळत आहे. अशातच आता पाकिस्तानचा माजी सलामीवीर फलंदाज सलमान बट्टने (Salman batt) वादग्रस्त वक्तव्य केलंय.
मला माहित नाही की पांड्याकडे कर्णधार (Captain Hardik Pandya) म्हणून कोण पाहतंय आणि कोणाला अशी स्वप्ने पडत आहेत. पांड्याकडे प्रतिभा आहे आणि त्याला आयपीएलमध्ये (IPL) यशही मिळालंय. पण रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील आयपीएलमध्येही अफाट यश मिळवलं होतं. वर्ल्ड करमध्ये त्यानं चांगल्या धावा केल्या असत्या तर लोकांनी हार्दिकचा विषय काढलाच नसता, असं सलमान बट्ट (Salman Batt On Hardik Pandya) म्हणाला आहे.
आशिया खंडातील लोकांनी आपलं मत मांडण्याची घाई असते. अनेकदा एखाद्या घटनेबद्दल लोक रिअॅक्ट होतात. त्यांना आपलं मत मांडायचं असतं. त्यामुळे कर्णधार बदला, अशी मागणी लोक करतात. वर्ल्ड कप फक्त एकाच संघाला जिंकायचा होता, पण याचा अर्थ इतर टीमने कामगिरी खराब होती असा होत नाही, असंही बट्ट (Salman Batt) म्हणाला आहे.
आणखी वाचा - Team India सांभाळण्यासाठी पांड्या सक्षम आहे का? DK म्हणतो "मला वाटत नाही की..."
दरम्यान, फक्त एका संघाने वर्ल्ड कप जिंकलाय पण इतर संघांचा वर्ल्ड कपमध्ये पराभव झालाय. याचा अर्थ उर्वरित 11 संघांचे कॅप्टन बदलणार का?, असा सवाल देखील त्याने (Salman Batt On Team India) उपस्थित केला जातोय. सध्या आपली यंगिस्तान न्यूझीलंडमध्ये (Ind Vs Nz 2nd T20) कशी कामगिरी करणार यावर सर्वांचं लक्ष लागलंय.