Sara Tendulkar : मॅच दरम्यान साराच्या शेजारी बसलेला तो मिस्ट्री बॉय कोण?

अर्जुनने अखेर आज डेब्यू केला आहे. यावेळी अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरही सामना पाहण्यासाठी उपस्थित होती. मात्र यावेळी सारासोबत एक मिस्ट्री बॉयला स्पॉट करण्यात आलं आहे. 

Updated: Apr 16, 2023, 11:08 PM IST
Sara Tendulkar : मॅच दरम्यान साराच्या शेजारी बसलेला तो मिस्ट्री बॉय कोण? title=

Sara Tendulkar Mystery Boy:  मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede) सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) डेब्यू केला. चाहत्यांना ज्यांच्यी उत्सुकता होती, तो दिवस अखेर आज उजाडलाच. मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) अर्जुनने अखेर आज डेब्यू केला आहे. यावेळी अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरही सामना पाहण्यासाठी उपस्थित होती. मात्र यावेळी सारासोबत एक मिस्ट्री बॉयला स्पॉट करण्यात आलं आहे. 

मिस्ट्री बॉयसोबत स्पॉट झाली सारा

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता. अर्जुनने डेब्यु केलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 5 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान भावाला सपोर्ट करण्यासाठी सचिनची मुलगी सारा तेंडुलकरही स्टेडियममध्ये आली होती. सारा एका मिस्ट्री बॉयसोबत स्टेडियममध्ये दिसली. या मिस्ट्री बॉयशी साराचा काय संबंध आहे ते पाहूयात.

सारासोबत असलेला तो मुलगा कोण?

अर्जुनच्या गोलंदाजीवर सारा तेंडुलकरने खास रिएक्शनही दिली होती. आजच्या सामन्यात कॅमेरामॅननेही सारा तेंडुलकरवर बराच फोकस केला होता. यावेळी सारा तिच्या मित्रांसोबत सामना पाहायला आलेलं दिसून आलं. दरम्यान सारासोबत बसलेला तो मुलगा तिचा मित्र असल्याचं समजतंय. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

अर्जुनसाठी सचिनची खास पोस्ट

सचिन तेंडूलकरने अर्जुनने डेब्यू केल्यानंतर खास पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये सचिन म्हणतो की, अर्जुन, तू क्रिकेटपटू म्हणून आज तुझ्या प्रवासात एक महत्त्वाचं पाऊल ठेवलंय. एक वडील असल्याच्या नात्याने मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुझ्या खेळाबद्दल पॅशिनेट आहे. मला माहित आहे की, तु खेळाला योग्य तो आदर देत राहशील आणि खेळ तुझ्यावर देखील प्रेम करत राहील.

कशी झाली अर्जुनची गोलंदाजी

मुंबई इंडियन्सकडून पहिली ओव्हर अर्जुनने केली. या ओव्हरमध्ये अर्जुनने केवळ 5 रन्स दिले. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने 12 रन्स खर्च केले. यावेळी 8.50 च्या इकोनॉमीने त्याने रन्स दिले. आजच्या सामन्यात अर्जुनला केवळ 2 ओव्हर्स टाकण्याची संधी मिळाली. दरम्यान आता पुढच्या सामन्यात त्याला संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.