16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या T20 World Cup साठी सर्व क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. आगामी T20 World Cup साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आशिया चषकात भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी हा रोहित शर्माच्या संघाला टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून मोठा धक्का मानला जात आहे. सुपर 4 मध्ये भारत पाकिस्तान (pakistan) आणि श्रीलंकेविरुद्ध (sri lanka) पराभूत झाल्याने अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. रवींद्र जडेजाची (ravindra jadeja) दुखापत हे भारताच्या पराभवाचे मुख्य कारण होते.
हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यादरम्यान जडेजा (ravindra jadeja) दुखापतग्रस्त झाला आणि स्पर्धेतून बाहेर पडला, ज्यामुळे प्लेइंग इलेव्हनचे गणित बिघडले त्यामुळे भारतीय संघाला मोठा फटका बसला. शस्त्रक्रियेनंतरही जडेजाला टी-20 विश्वचषक संघातूनही (T20 World Cup) बाहेर ठेवण्यात आलं आहे.
श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेच्या (mahela jayawardene) म्हणण्यानुसार, रविंद्र जडेजाच्या (ravindra jadeja) टी-20 विश्वचषक संघातील अनुपस्थितीमुळे भारताचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
रविंद्र जडेजा आशिया कप स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जडेजाने 35 धावांची शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.
आयसीसी रिव्ह्यूमध्ये ( ICC Review) बोलताना महेला जयवर्धनेने (mahela jayawardene) सांगितले की, "भारतीय संघासाठी हे एक आव्हान आहे. जडेजाने पाचव्या क्रमांकावर येऊन चांगला खेळ केला आहे. तो खरोखरच चांगली फलंदाजी करत आहे आणि तो आणि हार्दिक पंड्या (hardik pandya) टॉप सिक्समध्ये आहेत. अष्टपैलू खेळाडूंचा पर्याय देऊ शकतील अशा या दोन खेळाडूंनी भारताच्या फलंदाजीमध्ये खूप लवचिकता आणली आहे."
"संघासाठी हे कठीण जाणार आहे आणि कदाचित डावखुरा फलंदाज नसणे ही चिंतेची बाब आहे. संघाने दिनेश कार्तिकला (dinesh karthik) हटवून ऋषभ पंतला (rishabh pant) आणले आहे, जो पाचव्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. विश्वचषकात जाण्यासाठी त्याला काही गोष्टी निश्चित कराव्या लागणार आहेत. पण जडेजाची अनुपस्थिती, तो ज्या फॉर्ममध्ये होता, ते पाहता मोठे नुकसान होईल," असेही जयवर्धेने यांनी म्हटलं आहे.