पाकिस्तानी क्रिकेरच्या पत्नीला आवडतो विराट कोहली, सोशल मीडियावर म्हणाली...

पाकिस्तानमध्येही विराट कोहलीची लोकप्रियता खूप जास्त आहे.

Updated: Oct 25, 2021, 06:34 PM IST
पाकिस्तानी क्रिकेरच्या पत्नीला आवडतो विराट कोहली, सोशल मीडियावर म्हणाली...

मुंबई : विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे आणि ही गोष्ट कोणापासूनही लपलेली नाही. बऱ्याच काळापासून विराटची बॅट चालली नसली तरी तो स्टार खेळाडूंपैकी एक आहे आणि याची ग्वाही त्याच्या नाववर असलेले रेकॉर्ड्स देतात. विराट कोहलीला 'रन मशीन' म्हणून त्याचे चाहते ओळखतात. विराटचे भारतातच नाही तर भारता बाहेर देखील अनेक फॉलोअर्स आहेत.

एवढंच काय तर इतिहासापासून वैर असलेल्या पाकिस्तानमध्ये देखील भारताचे खूप फॅन्स आहेत. पाकिस्तानमध्येही विराट कोहलीची लोकप्रियता खूप जास्त आहे. त्यात तुम्हाला हे जाणून देखील आश्चर्य वाटेल की, पाकिस्तान क्रिकेट संघातील एका खेळाडूची बायको देखील विराट कोहलीची खूप मोठी फॅन आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा गोलंदाज हसन अलीची पत्नी शमिया आरझू ही विराट कोहलीची 'खूप मोठी फॅन' आहे. ही गोष्ट शामिया आरझूने स्वत: तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर चाहत्यांसमोर कबुल केली. तिने विराट कोहली तिचा आवडता फलंदाज असल्याचे सोशल मीडियावरती सांगितले.

विराट कोहलीची फॅन असण्यासोबतच शामिया आरजूचे भारताशी देखील खास नातं आहे. वास्तविक, शामिया ही एक भारतीय नागरिक आहे, तिने 2019 मध्ये दुबईमध्ये पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अलीशी लग्न केले होते.

शामिया भारतातील हरियाणाची आहे. ती हरियाणातील नूह जिल्ह्यातील चांदेनी गावची रहिवासी आहे. शामिया एमिरेट्स एअरलाइन्समध्ये फ्लाइट इंजिनियर आहे आणि तिचे कुटुंब नवी दिल्लीत स्थायिक आहे. शामिया आरजू काही वर्षांपूर्वी दुबईत पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाला भेटली आणि तेव्हापासून त्यांची मैत्री वाढली. काही वर्षांच्या मैत्रीनंतर दोघे प्रेमात पडले तेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

शामियाने विराट कोहलीला तिचा आवडता फलंदाज म्हणून सांगितले होते, तर तिने तिचा आवडता गोलंदाज पती हसन अली असल्याचे देखील सांगितले. हसन अली आणि शामिया आरझू यांचा विवाह त्यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय होता. शामियाचे वडील लियाकत अली यांनी सांगितले की, फाळणीच्या वेळी त्यांचे अनेक नातेवाईक पाकिस्तानात गेले होते.

भारतीय मुलीशी लग्न करणारा हसन अली हा चौथा पाकिस्तानी क्रिकेटर आहे. त्याच्या आधी झहीर अब्बास, मोहसीन खान आणि शोएब मलिक यांनीही भारतीय वंशाच्या मुलीशी लग्न केले आहे.