आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज घोषणा

मोस्ट अवेटेड अशा दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यासाठी टीम इंडियाची आज घोषणा होणार आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 4, 2017, 01:26 PM IST
आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज घोषणा title=

नवी दिल्ली : मोस्ट अवेटेड अशा दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यासाठी टीम इंडियाची आज घोषणा होणार आहे. 

भारतीय निवड समितीची यासाठी दिल्लीत बैठक होणार आहे. 17 सदस्यीय टीमची या दौ-यासाठी निवड करण्यात .येणार आहे. चार फास्ट बॉलर्स, तीन स्पिनर्स की, पाच स्पेशलिस्ट फास्ट बॉलर्सची निवड करण्यात येणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. 

जसप्रीत बुमरालाही टेस्ट टीममध्ये संधी मिळून शकते. त्याचप्रमाणे भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि उमेश यादवची निवड निश्चित मानण्यात येतेय. 

आता या खडकर दौ-यासाठी टीम इंडियात कुणाला संधी मिळते ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. भारतीय टीम या दौ-यात तीन टेस्ट, सहा वन-डे आणि तीन टी-20 मॅचेस खेळणार आहे. ५ जानेवारीपासून केपटाऊन टेस्टपासून टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकन दौ-याला सुरुवात होणार आहे.