क्रिकेट विश्वातून मोठी बातमी; Asian Cup आधी टीम इंडियाला झटका?, 'हे' 3 खेळाडू निवृत्तीच्या तयारीत !

Team India Cricket News : आशिया कप स्पर्धेचे (AFC Asian Cup) आयोजन हे हायब्रिड पद्धतीने करण्यात आले आहे. त्यानुसार श्रीलंका आणि पाकिस्तान या संघादरम्यान सामने पार पडले आहेत. आता टीम इंडियासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 25, 2023, 11:25 AM IST
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी;  Asian Cup आधी टीम इंडियाला झटका?, 'हे' 3 खेळाडू निवृत्तीच्या तयारीत ! title=

Team India Cricket News : भारतीय क्रिकेट विश्वातून मोठी बातमी. आशिया कपआधी टीम इंडियाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचे आघाडीचे तीन खेळाडू निवृत्तीच्या तयारीत असल्याचे समजते आहे. ते आशिया कपआधी निवृत्ती जाहीर करु शकतात, अशी शक्यता आहे.

आशिया कप स्पर्धेचे (AFC Asian Cup) आयोजन हे हायब्रिड पद्धतीने करण्यात आले आहे. त्यानुसार श्रीलंका आणि पाकिस्तान या संघादरम्यान सामने पार पडले आहेत. आता टीम इंडियासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  कारण आशिया कपआधी टीम इंडियाचे तीन खेळाडू निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रोहित शर्मा आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी आशिया कप हा म्हत्त्वाचा आहे. त्यासाठी टीम इंडिया आपली चांगली कामगिरी करण्याच्या तयारीत आहे. टीम इंडिया या आशिय कप स्पर्धेतूनच थेट वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यासाठी सज्ज आहे. त्याचवेळी ही निवृत्तीची बातमी धडकली आहे.

टीम इंडियाकडून कोण निवृत्ती जाहीर करु शकते, याची उत्सुकता आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार दिनेश कार्तिक यांचे नाव आघाडीवर आहे. कार्तिक सध्या क्रिकेट सामन्यांचे सूत्रसंचलन करत आहे. कार्तिक याने आतापर्यंत कसोटीचे 60 तर  टी -20 चे 60   आणि एकदिवसीय 94  सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केले आहे. मात्र, दिनेश कार्तिक याची क्रिकेट कारकीर्द अखेरच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे तो निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता अधिक आहे.

सध्या कार्तिक टी-20 क्रिकेटमध्ये खेळत आहे. कार्तिकने आंतरराषट्रीय क्रिकेटमध्ये एकमेव शतक केले आहे. कार्तिकने टेस्ट क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 25 धावा केल्या आहेत. तसेच वनडेत 9 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 752 आणि टी 20 क्रिकेटमध्ये 686 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाचा दुसरा खेळाडू केदार जाधव हा निवृत्तीची घोषणा करु शकतो. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय करु शकतो. केदारने आतापर्यंत 73 वनडे आणि 9 टी -20 सामन्यांत खेळला आहे. केदारने वनडे क्रिकेटमध्ये 2 शतक आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 389 धावा केल्यात. तर टी 20 मध्ये एकमेव अर्धशतकासह केवळ 122 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची कामगिरी तशी साधारण राहिली आहे. त्याला टीम इंडियात स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे.

दरम्यान, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा टीम हा अनुभवी खेळाडू आहे. मात्र तो वादग्रस्त ठरला आहे. त्याच्यावर कारवाईही झाली. त्यामुळे तो टीम इंडियात नव्हता. आता इशांत गेल्या काही काळापासून टीम इंडियापासून दूर आहे. इशांत हा टीम इंडियात कमबॅक करु शकणार नाही, अशीच स्थिती आहे. तो टीम इंडियात जवळपास दोन वर्षांपासून नाही. त्यामुळे तोही आशिया कपआधी निवृत्तीची घोषणा करु शकतो. इशांत याने 105 कसोटीत 311 तर 80 वनडेत 115 आणि 14 टी-20 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत.