'यावेळी विराट नाही तर रोहित'; हिटमॅनच्या शिवीवर बेन स्टोक्सचा टोला

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रोहित शर्माने शतकं झळकावली.

Updated: Oct 5, 2019, 05:33 PM IST
'यावेळी विराट नाही तर रोहित'; हिटमॅनच्या शिवीवर बेन स्टोक्सचा टोला

विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रोहित शर्माने शतकं झळकावली. दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित शर्मा १४९ बॉलमध्ये १२७ रनची खेळी केली. पण या खेळीदरम्यानचा रोहितचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुजारासोबत खेळत असताना रोहितने त्याला शिवी दिली. स्टम्प मायक्रोफोनमध्ये रोहित शर्माचा आवाज कैद झाला.

२६व्या ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर ६२/१ असा होता. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा बॅटिंग करत होते. पिडिटने टाकलेला बॉल रोहित शर्माने ऑफ साईडला मारला. यानंतर रोहित शर्मा रन काढण्यासाठी सरसावला, पण पुजाराने रन घ्यायला नकार दिला, तेव्हा रोहितने पुजाराबद्दल अपशब्द काढले.

रोहित शर्माने दिलेल्या या शिवीवर इंग्लंडचा खेळाडू बेन स्टोक्सने जोरदार टोला हाणला आहे. 'यावेळी विराट नाही, तर रोहित... जर तुम्हाला कळलं असेल तर...' असं ट्विट स्टोक्सने केलं आहे.

विराट कोहली मैदानात अपशब्द वापरत नाही, तर तो बेन स्टोक्स म्हणतो, असं म्हणत काही दिवसांपूर्वी ट्रोल करण्यात येत होतं. मग या ट्रोलिंगमध्ये बेन स्टोक्सनेही उडी घेतली होती. यापुढे विराटच्या अपशब्दावर माझं नाव घेतलंत तर मी सोशल नेटवर्किंगवरची माझी अकाऊंट डिलीट करीन, असं इशाराच स्टोक्सने दिला होता. आता तर खुद्द बेन स्टोक्सनेच विराट आणि रोहितला ट्रोल केलं आहे.