Ind vs Irl : कॅप्टनच्या विश्वासाला पात्र ठरला आणि भारताला विजय मिळाला

दुसऱ्याच सामन्यात कॅप्टन हार्दिकचा विश्वास जिंकला, टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला

Updated: Jun 29, 2022, 05:24 PM IST
Ind vs Irl : कॅप्टनच्या विश्वासाला पात्र ठरला आणि भारताला विजय मिळाला title=

वउमरान मलिकला आयपीएलच्या दोन वर्ष दमदार कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देखील त्याला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली. मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात आलं नाही. त्यावरून देखील सोशल मीडियावर ऋषभ पंतवर खूप टीका करण्यात आली. 

आयर्लंड सीरिजदरम्यान हार्दिक पांड्याने उमरानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. टीम इंडियात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उमरानला डेब्यूची संधी मिळाली. या संधीचं उमरानने सोनं केलं. तो हार्दिक पांड्याच्या विश्वासाला पात्र ठरला आणि अखेर शेवटचा सामना त्याने जिंकवून दिला. 

पहिल्या सामन्यात पावसानं खो खालता. त्यामुळे 12 ओव्हर्सचा सामना खेळवण्यात आला. त्यामध्ये हार्दिकने उमरानला एक ओव्हर टाकण्याची संधी दिली. या ओव्हरमध्ये त्याला विकेट घेण्यात यश आलं नाही. 

दुसऱ्या सामन्यात मात्र उमरानने दमदार कामगिरी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिक पांड्याने उमरानला मैदानात बॉलिंगसाठी उतरवलं. पहिल्या 3 बॉलवर उमरानने 9 धावा दिल्या. 3 बॉलवप 8 धावांची गरज होती. उमरानने 3 बॉलवर 3 धावा दिल्या आणि टीम इंडियाला 4 धावांनी सामना जिंकवून दिला. 

हार्दिक पांड्यानेही विजयाचं श्रेय बॉलर्सना दिलं आहे. उमरानने कमाल कामगिरी केली. एका ओव्हरमध्ये 17 धावा काढणं आयर्लंडसाठी म्हणायला घेतलं तर शक्य होतं. कारण त्यांची बॅटिंग चांगली होती. मात्र बॉलर्सनी आपलं कौशल्य दाखवलं आणि 4 धावांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला.