WTC Final 2023: 'शुभमनची सचिन-विराटशी तुलना करू नका, तो अजून...', गॅरी कर्स्टन यांची सडकून टीका!

Shubman Gill, WTC Final 2023: गॅरी कर्स्टन यांनी भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलची तुलना महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्याशी करणं अयोग्य असल्यां मत व्यक्त (Gary Kirsten on Shubman Gill) केलं आहे.

Updated: Jun 3, 2023, 06:00 PM IST
WTC Final 2023: 'शुभमनची सचिन-विराटशी तुलना करू नका, तो अजून...', गॅरी कर्स्टन यांची सडकून टीका! title=
Shubman Gill, Gary Kirsten

Gary Kirsten on Shubman Gill: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम (WTC Final 2023) सामन्यासाठी आता फक्त 3 दिवस शिल्लक आहे. येत्या 7 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात आयपीएलमध्ये अफलातून कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलच्या (Shubman Gill) कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. शुभमन सध्या चांगल्या लयीत आहे. त्यामुळे सध्या त्याची सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली यांच्याशी तुलना केली जाते. अशातच आता टीम इंडियाचे माजी कोच आणि गुजरात टायटन्सचे मेटॉर राहिलेल्या गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले गॅरी कर्स्टन?

गॅरी कर्स्टन यांनी भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलची तुलना महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्याशी करणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त (Gary Kirsten on Shubman Gill) केलं आहे.

शुभमन गिल हा एक तरुण खेळाडू आहे. ज्याच्याकडे अविश्वसनीय कौशल्य आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होण्याची क्षमता आहे. इतक्या लवकर त्याची सचिन आणि विराटशी तुलना करणं अयोग्य ठरेल, असं गॅरी कर्स्टन म्हणाले. भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये यशस्वीपणे खेळण्याचे कौशल्य शुभमन गिलकडे आहे. खासकरून टी-ट्वेंटी फॉर्मटच्या युगात खासकरून त्याचं कौशल्य प्रगतीचा रस्ता दाखवणारा आहे, असंही कर्स्टन म्हणाले.

आणखी वाचा - David Warner Retirement : डेव्हिड वॉर्नरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; 'या' दिवशी खेळणार अखेरचा सामना!

शुभमनचा आत्मविश्वास त्याला आणि बाकी सर्वांना प्रभावित करतो. त्याच्या खेळामध्ये नैतिकता आणि व्यावसायिकता दिसून येते. तो खेळांची तयारी कशी करतो आणि शेवट कसा करतो, हे स्पष्टपणे दिसून येतं. आगामी काळात खेळाबद्दलची त्याची समज आणि तो त्याच्या कौशल्याच्या सेटसह कसा कामगिरी करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

WTC साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, मोहम्मद शमी, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

कसा असेल ऑस्ट्रेलियाचा संघ?

पॅट कमिंस (कर्णधार), डेविड वॉर्नर, ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव स्मिथ (उपकर्णधार), कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, एलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), जोश इंगलिस (यष्टीरक्षक), स्कॉट बोलँड, जोश हेजलवुड, नाथन लियोन, टॉड मर्फी, मिशेल स्टार्क.