close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

VIDEO: जसप्रीत बुमराहच्यामध्ये आला पोलार्ड

वेस्ट इंडिजचा विस्फोटक बॅट्समन कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये गेल्या अनेक मोसमांपासून मुंबईकडून खेळतात.

Updated: Nov 7, 2018, 08:41 PM IST
VIDEO: जसप्रीत बुमराहच्यामध्ये आला पोलार्ड

लखनऊ : वेस्ट इंडिजचा विस्फोटक बॅट्समन कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये गेल्या अनेक मोसमांपासून मुंबईकडून खेळतात. या दोघांनी अनेकवेळा मुंबईला विजयही मिळवून दिले आहेत. पण लखनऊमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२०वेळी हे दोघं एकमेकांविरुद्ध खेळत होते. वेस्ट इंडिज भारतानं ठेवलेल्या १९६ रनच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत होती. एवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला सुरुवातीपासूनच धक्के लागत होते.

जसप्रीत बुमराहनं ११ व्या ओव्हरमध्ये कायरन पोलार्डला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. बुमराहच्या बॉलिंगवर पोलार्डनं शॉट मारण्याचा प्रयत्न केला. हा बॉल हवेत गेला आणि बुमराहनं त्याच्याच बॉलिंगवर पोलार्डचा कॅच पकडला. कॅच पकडत असताना पोलार्डनं बुमराहच्या मध्ये जायचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. पोलार्डनं ११ बॉलमध्ये फक्त ६ रन केले.