VIDEO : विराट कोहलीने पूर्ण केले ५ हजार रन्स, द्रविड आणि अजहरला टाकले मागे

टीम इंडिया आणि श्रीलंका टीम दिल्लीत तिस-या टेस्टसाठी आमनेसामने आहेत. या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीने काही रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहे.

Updated: Dec 2, 2017, 01:56 PM IST
VIDEO : विराट कोहलीने पूर्ण केले ५ हजार रन्स, द्रविड आणि अजहरला टाकले मागे title=

नवी दिल्ली : टीम इंडिया आणि श्रीलंका टीम दिल्लीत तिस-या टेस्टसाठी आमनेसामने आहेत. या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीने काही रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहे.

दुहेरी शतक लगावणारा ११वा खेळाडू 

२५ रन्स करून त्याने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. या सामन्यात त्याने त्याचे टेस्ट क्रिकेटमधील ५ हजार रन्स पूर्ण केले आहेत. दुस-या टेस्टमध्ये आपल्या करिअरमधील पाचवं दुहेरी शतक लगावणारा विराट कोहली हा ११वा भारतीय खेळाडू आहे. विराटने या सामन्याआधी ६२ सामन्यांमध्ये ५१.८२ च्या सरासरीने ४९७५ रन्स केले होते. 

हे करणारा पहिला खेळाडू

क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये ५० च्या वर सरासरी असणारा विराट कोहली हा जगातला एकुलता एक खेळाडू आहे. या सीरिजच्याआधी विराटची टेस्ट क्रिकेटची सरासरी ५० च्या कमी आहे. पण श्रीलंए विरूद्ध पहिल्या दोन टेस्ट सामन्यांमध्ये दोन शतक लगावून त्याने ही कमतरता पूर्ण केली आहे.  

५ हजार रन्स केले पूर्ण

कोहलीने हे ५ हजार रन्स फोर लगावून पूर्ण केले आहेत. भारताकडून सर्वात वेगवान ५ हजार रन्स करण्याच्या बाबतीत विराट कोहली आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत पहिल्या नंबरवर टीम इंडियाचा माजी खेळाडू सुनील गावस्कर आहे. त्याने हा कारनामा १९७९ मध्ये ९५ खेळींमध्ये केला होता. 

दुस-या नंबरवर सेहवाग

दुस-या क्रमांकावर विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग हा आहे सेहवागने ९९ खेळींमध्ये २००८ मध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. तिस-या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुलकर हा आहे. त्याने १०३ खेळींमध्ये ५ हजार रन्स केले होते. तर चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराटने १०५ इनिंगमध्ये ५ हजार रन्स केले आहेत. त्याच्यानंतर राहुल द्रविड आणि मोहम्मद अझरूद्दीन यांचा नंबर येतो.