VIDEO : रणजीच्या शहंशाहने इराणी ट्रॉफीत रचला इतिहास, गावस्कर-वेंगसरकर पडले मागे

रन मशीन म्हणून लोकप्रिय असलेल्या वसीम जाफर याने नागपूरमध्ये सुरू असलेया इराणी कपमध्ये बुधवारी एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.

Updated: Mar 15, 2018, 10:39 AM IST
VIDEO : रणजीच्या शहंशाहने इराणी ट्रॉफीत रचला इतिहास, गावस्कर-वेंगसरकर पडले मागे title=

नागपूर : रन मशीन म्हणून लोकप्रिय असलेल्या वसीम जाफर याने नागपूरमध्ये सुरू असलेया इराणी कपमध्ये बुधवारी एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. त्याने पहिल्या दिवशी शानदार १६६ बॉल्समध्ये ११३ रन्स केले. प्रथम श्रेणीमध्ये वसीम जाफरचं हे ५३वं शतक आहे. याआधी त्याने शानदार फलंदाजी करत टीम विदर्भला रणजी ट्रॉफीमध्ये विजय मिळवून दिला होता.  

या सामन्यात काय स्कोर

शेष भारत विरूद्ध इराणी कपमध्ये विदर्भच्या टीमने पहिले फलंदाजी करत पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत २ विकेटवर २८९ रन्स केले. जाफर ११३ रन्सवर आणि गणेश सतीश २९ रन्सवर मैदानात खेळत आहे. 

सर्वात जास्त रन्स करणारा खेळाडू

इराणी कपमध्ये वसीम जाफर सर्वात जास्त रन्स करणारा खेळाडूही झाला आहे. या सामन्यात याआधी त्यांच्या नावावर या सीरिजच्या १२ सामन्यांमध्ये १००८ ११११ रन्स झाले आहेत. यात तीन शतकांचाही समावेश आहे. या यादीत गुंडप्पा विश्वनाथ दुस-या स्थानावर आहे. तर तिस-या स्थानावर वेंगसरकर आणि पाचव्या नंबरवर सुनील गावस्कर आहे. 

हे करणारा दुसरा खेळाडू

या खेळीदरम्यान वसीम जाफरने अर्धशतक करताच तो ईराणी कपमध्ये लागोपाठ ६ अर्धशतकं लगावण्यात गुंडप्पा विश्वनाथ याच्यानंतर देशातील दुसरा खेळाडू ठरला आहे. इराणी कपमध्ये त्याने शेवटच्या पाच खेळींमध्ये ११३, ८०, ८८, ७१ आणि ६८ असा स्कोर केलाय. 

रणजीमध्ये १० हजार पेक्षा जास्त रन्स

त्याने रणजी ट्रॉफीच्या इतिहासात ९वं फायनल खेळलं आहे. जाफर रणजी ट्रॉफी सामन्यात सर्वात जास्त रन्स करणारा खेळाडू आहे. त्याने रणजीमध्ये आत्तापर्यंत १० हजार पेक्षा जास्त रेन्स केले आहेत. त्यामुळे या ट्रॉफीचा त्याला सचिन तेंडुलकर म्हटलं जातं. 

वसीम जाफरच्या नावावर एक आणखी रेकॉर्ड आहे. त्यात त्याने आजपर्यंत जितक्याही टीमकडून फायनल खेळले आहे. त्या टीम रणजी ट्रॉफीमध्ये चॅम्पियन झाल्या आहेत. यावेळीही विदर्भची टीम फायनलमध्ये पोहोचली आणि विजयी झाली.