मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वात फिट क्रिकेटरांच्या यादीत येतो. आपल्या फिटनेसच्या बाबतीत तो फारच लक्ष देतो. कोहली फक्त जिमच करत नाही तर आपल्या जेवणाकडे देखील विशेष लक्ष देतो. कोहली नॉनव्हेजचा शौकीन आहे. त्याला चिकन आणि बिरयानी खूप आवडते. पण आपल्या फिटनेससाठी त्याने नॉनव्हेज पूर्णपणे सोडलं आहे.
फिटनेससाठी कोहलीने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीने मागील 4 महिन्यांपासून नॉनव्हेज खाणं पूर्णपणे बंद केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कर्णधार कोहलीने अॅनिमल प्रोटीनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. नॉनव्हेज सोडल्याने आणि व्हेज खाल्याने त्याचा खेळ आणखी चांगला होऊ शकतो असं त्याला वाटतं. कोहली सध्या प्रोटीन शेक, भाज्या आणि सोया खाणं पसंद करतोय. कोहलीने अंडे आणि डेअरी प्रॉडक्ट खाणं देखील बंद केलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मागील 4 महिन्यांमध्ये कोहली फक्त व्हेज खाण्यावर लक्ष देतोय. यामुळे पचनशक्ती आणखी चांगली होईल असं त्याला वाटतं आहे. यामुळे तो फिट असल्याचं त्याला जाणवतं आहे. विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला आहे.