नवीन टीम इंडियामध्ये विराट कोहलीची भूमिका काय? रोहित शर्मा म्हणतो...

कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीची काय भूमिका असेल याबाबत स्पष्टता दिली आहे.

Updated: Nov 17, 2021, 08:27 AM IST
नवीन टीम इंडियामध्ये विराट कोहलीची भूमिका काय? रोहित शर्मा म्हणतो... title=

मुंबई : टी-20 वर्ल्डकप संपल्यानंतर भारत आजपासून नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. नवीन कोच राहुल द्रविड आणिव नवा कर्णधार रोहित शर्माच्या सोबतीने टीम इंडिया नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे. न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या सिरीजपूर्वी झालेल्या प्रेस क्रॉन्फरन्समध्ये कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीची काय भूमिका असेल याबाबत स्पष्टता दिली आहे.

यावेळी रोहितला फलंदाज म्हणून कोहलीची काय भूमिका असेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहित शर्माने उत्तर दिलं की, "विराट कोहली आतापर्यंत जे करत आला होता तसंच करेल आणि त्याची तशीच भूमिका असेल. टीमच्या नजेरतून तो एक मोठा प्लेअर आहे. आणि त्यानुसार प्रत्येक खेळाडूची भूमिका वेगळी असते."

विराट कोहलीने टी-20 फॉर्मेटचं कर्णधारपद सोडलं आहे. त्यातच न्यूझीलंडच्या तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये त्याला आराम देण्यात आला आहे. यानंतर आता विराट कोहली थेट दुसऱ्या टेस्टवेळी टीममध्ये पुनरागमन करणार आहे.

रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत टीमच्या पुढील योजनेवर चर्चा केली. राहुल द्रविड म्हणाला की, टाइम लोड मॅनेजमेंटवर काम करणं हा आता क्रिकेटचा एक भाग बनला आहे. त्यामुळे या आव्हानाचा सामना आपल्याला स्वतःलाच करायचा आहे. 

हे आव्हान केवळ आपल्यासाठीच नाही तर सर्व देशांसाठी आहे, असंही राहुल द्रविड म्हणाला. कारण न्यूझीलंडने केन विल्यमसनलाही टी-20 मालिकेत विश्रांती दिली आहे.