Rohit Sharma On ICC World Cup 2023 : क्रिकेटच्या महाकुंभाचं बिगुल वाजलं आहे. उद्यापासून वर्ल्ड कपला धमाकेदार अंदाजात सुरूवात होईल. पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात खेळवला जाईल. इंग्लंडने घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकला होता, त्यामुळे आता न्यूझीलंड फायनलमधील पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारला जातोय. अशातच आता भारत देखील यंदा घरच्या मैदानात वर्ल्ड कप खेळेल. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार, अशी सर्वांना आशा आहे. मात्र, रोहित शर्माला वर्ल्ड कपबाबत शाश्वती नसल्याचं दिसतंय. टीम इंडिया 12 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकेल का? असा सवाल रोहित शर्माला विचारण्यात आला होता. त्यावेळी रोहित काय म्हणालाय पाहा...
टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकेल की नाही? याचं उत्तर माझ्याकडे नाही. यावर आता मी असं कसं म्हणू? मी आता फक्त आशा करू शकतो की आमचा संघ चांगल्या परिस्थिती खेळावा. टीम इंडियामधील प्रत्येकजण फिट अँड फाईन आहे. प्रत्येक खेळाडू फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे आम्ही चांगला खेळ करू एवढंच मी आता सांगू शकतो, यापलीकडे मी काही बोलू शकत नाही, असं रोहित शर्मा म्हणतो.
परिस्थिती कशीही असो आपण चांगला विचार करणं हा महत्त्वाचा घटक आहे. आम्ही बाहेर काय घडत याचा विचार करत नाही आणि ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, असंही रोहित शर्मा म्हणाला आहे.
दरम्यान, टीम इंडिया यंदा भारताच्या मैदानावर खेळणार आहे. 2011 साली टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. धोनीच्या नेतृत्वाखाली युवराज, गंभीर, सचिन, सेहवाग, जहीर खान यांच्यासारख्या दिग्गजांनी भारताला 28 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. अशातच आता 12 वर्षानंतर पुन्हा टीम इंडिया वर्ल्ड कप उचलावा, अशी आशा सर्वांना लागली आहे.
भारत: रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (व्हाईस कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.