World Cup 2019 | ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी विजय

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 334 धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 10 बाद 247 धावा केल्या.

PTI | Updated: Jun 15, 2019, 11:08 PM IST
World Cup 2019  | ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी विजय title=
Image Courtesy: Twitter/@cricketcomau

लंडन : ओव्हल मैदानात आज वर्ल्ड कपचा २०वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकामध्ये खेळला केला. श्रीलंकाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर ३३५ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, श्रीलंकेला हे आव्हान पार करता आले नाही. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 87 धावांना पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 334 धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 10 बाद 247 धावा केल्या.

कर्णधार दिमुथ करुणरत्ने आणि पेरेरा यांच्या अर्धशतकी खेळीनंतरही श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. चांगल्या सुरुवातीनंतरही मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली निराशाजनक कामगिरीमुळे श्रीलंकेला पराभवाला सामोरे जावे लागले.

 ऑस्ट्रेलियाकडून श्रीलंकेला ३३५ धावांचे आव्हान

करुणरत्ने आणि पेरेरा यांनी पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियासमोर आव्हान निर्माण केले. मात्र, स्टार्कने पेरेराचा त्रिफळा उडवत श्रीलंकेला धक्का दिला. पेरेराने 52 धावांची खेळी केली. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या फलंदाजांनी थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर त्यांचे काही चालले नाही. करुणरत्ने माघारी परतल्यानंतर लंकेच्या डावाला घसरगुंडीच लागली.