नेदरलँडच्या फलंदाजाने एका वर्षाने घेतला बदला; बाऊन्सवर षटकार ठोकला अन् नंतर...; VIDEO व्हायरल

नेदरलँडचा प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू बास डी लीडेने गोलंदाजी करताना चार विकेट्स मिळवले. तसंच फलंदाजी करताना 67 धावा ठोकल्या. दरम्यान त्याचा मैदानातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  

शिवराज यादव | Updated: Oct 7, 2023, 02:33 PM IST
नेदरलँडच्या फलंदाजाने एका वर्षाने घेतला बदला; बाऊन्सवर षटकार ठोकला अन् नंतर...; VIDEO व्हायरल title=

World Cup 2023: पाकिस्तानविरोधातील सामन्यात नेदरलँडच्या अष्टपैलू खेळाडू बास डी लीडेने आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केलं. शुक्रवारी हैदराबादमध्ये पाकिस्तान आणि नेदरलँड संघ भिडले होते. गोलंदाजी करताना बास डी लीडेने 62 धावा घेत 4 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजी करताना संघाकडून सर्वाधिक 67 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले. बास डी लीडेच्या जोरावर नेदरलँडने पाकिस्तानला चांगली झुंज दिली. पण अखेर पाकिस्तानने 81 धावांनी हा सामना जिंकला. 

फलंदाजी करताना बास डी लीडेने अनेक सुंदर फटके मारले. 29 व्या ओव्हरला हारिस रौफच्या गोलंदाजीवर त्याने पूलला षटकार ठोकला. दरम्यान हा फटका मारल्यानंतर बास डी लीडेने गोलंदाज हारिस रौफला डोळा मारला. इतक्या चांगल्या चेंडूवर षटकार लगावल्याने त्याने उपाहासात्मपणे हे कृत्य केलं. दरम्यान, त्याचा डोळा मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

2022 T20 विश्वचषकात रौफने बास डी लीडेला गोलंदाजी करताना बाउन्सर फेकला होता. त्यामुळे या बाऊन्सवर षटकार लगावला असता बास डी लीडेने त्याला त्या क्षणाची आठवण करुन देत बदलाच घेतला.

दरम्यान आपल्या अष्टपैलू खेळीने बास डी लीडेने रेकॉर्ड बूकमध्ये आपली नोंद केली आहे. वर्ल्डकपमध्ये पदार्पण केल्यानंतर अर्धशतक ठोकणारा आणि चार विकेट्स मिळवणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी झिम्बॉब्वेचे डंकन फ्लेचर (1983) आणि नेल जॉन्सन (1999) यांनी अशी कामगिरी केली आहे. 

बास डी लीडेने तिसऱ्या विकेटसाठी विक्रमजीत सिंगसह (67 चेंडूत 52) 76 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली आणि संघाला 100 धावांचा टप्पा ओलांडण्यात मदत केली. तत्पूर्वी, गोलंदाजी करताना त्याने मोहम्मद रिझवान (75 चेंडूत 68), इफ्तिखार अहमद (11 चेंडूत 9), शादाब खान (34 चेंडूत 32) आणि हसन अली यांचे विकेट्स मिळवले. 9 ओव्हर्समध्ये 62 धावा घेत त्याने 4 विकेट्स मिळवल्या. त्याच्या गोलंदाजीच्या बळावर नेदरलँड्सने पाकिस्तानला 49 षटकांत 286 धावांत गारद केलं. 

त्याच्याशिवाय कॉलिन अकरमनने (2/39, 8 षटके) 2 बळी घेतले. पण बास डी लीडेची अष्टपैलू खेळी वाया केली. कारण पाकिस्तानने हा सामना 81 धावांनी जिंकत वर्ल्डकपमधील पहिल्या विजयाची नोंद केली. नेदरलँडच्या बास डी लीडे आणि विक्रमजीत सिंग यांच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही आणि नेदरलँड्स अखेरीस 205 धावांवर सर्व बाद झाला.

नेदरलँड आता 9 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरोधात खेळणार आहे. तर पाकिस्तानचा सामना 10 ऑक्टोबरला श्रीलंकेविरोधात होणार आहे.