WTC 2021 अंतिम सामना ड्रॉ किंवा टाय झाला तर कोण विजेता ठरणार?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये ड्युक बॉलचा वापर केला जाणार आहे. 

Updated: May 28, 2021, 03:48 PM IST
WTC 2021 अंतिम सामना ड्रॉ किंवा टाय झाला तर कोण विजेता ठरणार?

मुंबई: भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून साऊथॅम्प्टन येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. ह्या सामन्यासाठी टीम इंडिया 2 जून रोजी भारतातून इंग्लंडला पोहोचणार आहे.

हा सामना पाहण्यासाठी तिकीट काढून चाहत्यांना स्टेडियममध्ये परवानगी देखील देण्यात आली आहे. क्रिकेट फॅन्स उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वजण या कसोटी सामन्याची आतूरतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या सामन्याबाबत मोठी घोषणा केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणण्यानुसार इंग्लंडमध्ये होणाऱ्या सामन्यादरम्यान तर कोणत्याही कारणामुळे सामना ड्रॉ झाला किंवा टाय झाला तर काय होईल याबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात होतं. पण त्यावर आयसीसीकडून उत्तर देण्यात आलं आहे. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही देशाच्या संघांना संयुक्त विजयी घोषित केलं जाऊ शकतं. 

या सामन्यासाठी जारी केलेल्या नियमांनुसार, 'ड्रॉ किंवा टाय असल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते मानले जाईल'. आयसीसीने म्हटले आहे की, 'जर पाच दिवसांचा खेळ पूर्ण झाला आणि सामन्याचा निकाल लागला नाही तर अशा परिस्थितीत आणखी सामने खेळले जाणार नाहीत. अशा परिस्थितीत सामना ड्रॉ घोषित केला जाईल. 

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये ड्युक बॉलचा वापर केला जाणार आहे. भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानात कूकाबुरा बॉलचा वापर करतं.

टीम इंडियामध्ये कोणकोण?
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकुर, उमेश यादव, के एल राहुल, ऋद्धिमान साहा.