WPL 2023: Third Umpire च्या निर्णयाविरोधात घेतला रिव्ह्यू; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, पाहा Video

Third Umpire Reverses Own Decision: ब्रेबॉर्न स्टेडियमवर रविवारी सुरू असलेल्या महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI vs UP) यांच्यातील सामन्यात थर्ड अंपायरने स्वतःचा निर्णय उलटवला. मुंबई इंडियन्सच्या  (Mumbai Indians) डावात पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही घटना घडली.

Updated: Mar 13, 2023, 12:02 AM IST
WPL 2023: Third Umpire च्या निर्णयाविरोधात घेतला रिव्ह्यू; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, पाहा Video title=
third Umpire Reverses Own Decision

WPL 2023: युपी वॉरियर्स (UP Warriorz) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात महिला प्रिमीयर लीगचा (WPL 2023) दहावा सामना रंगला होता. या सामन्यात (MI vs UP) मुंबईने विजयाची घोडदोड कायम ठेवली आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात एक ऐतिहासिक घटना पहायला मिळाली. या सामन्यात थर्ड अंपायरने (Third Umpire) स्वतःचा निर्णय उलटवल्याचं पहायला मिळालंय. त्यामुळे क्रिडाविश्वात सध्या याचीच चर्चा होताना दिसत आहे. (WPL 2023 third Umpire Reverses Own Decision During UP Warriorz Vs Mumbai Indians Latest sports news)

युपीच्या टीमने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. युपीच्या महिलांनी 20 ओव्हर्समध्ये 159 रन्स करत मुंबईला (Mumbai Indians) जिंकण्यासाठी 160 रन्सचं आव्हान दिलं. त्याचा पाठलाग करताना मुंबईच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. या सामन्यात मुंबई इंडियन्सने युपीचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. सामना मुंबईने जिंकला असला तरी मुंबई इंडियन्सच्या डावात पाचव्या ओव्हरमध्ये विचित्र घटना पहायला मिळाली.

नेमकं काय घडलं?

5 व्या ऑव्हरच्या 5 व्या चेंडूवर सोफी एक्लस्टन (sophie ecclestone) बॉलिंग करत होती. तिच्या बॉलवर मॅथ्यूज (hayley matthews) जरा हुकली आणि चेंडू थेट बॅट आणि पायावर आदळला. ग्राऊंड अंपायर्सने नॉट आऊट (Not Out) दिल्यानंतर युपीची कर्णधार हिलीने डीआरएसची (DRS) मागणी केली. त्यावेळी थर्ड अंपायरने रिव्ह्यु (Third Umpire Has Reversed His Own Decision) टेस्ट केला.

आणखी वाचा - WPL MI vs UP: Mumbai Indians च्या विजयाची गाडी सुसाट...! युपीचा 8 विकेट्सने केला पराभव

कॅमेऱ्याच्या मदतीने अपील चेक केली गेली तेव्हा एका एगलने बॉल बॅटवर जात होता. तर दुसऱ्या एगलने बॉल मॅथ्यूजच्या शुजवर पहिला टच झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे थर्ड अंपायरने निर्णय देताना आऊट दिला. थर्ड अंपायर्सच्या निर्णयानंतर मॅथ्यूज मैदानातून गेली नाही. तिने थर्ड अंपायर्सच्या निर्णयाला चॅलेंन्ज दिलं.

पाहा Video -

तिसऱ्या अंपायर्सने मॅथ्यूजचा निर्णय मान्य करत पुन्हा निर्णय तपासला. त्यावेळी बॉल बॅटला स्पर्श केल्याचं दिसून आलं. तेव्हा थर्ड अंपायर्सने आपलाच निर्णय बदलत मॅथ्यूजला नॉट आऊट दिलं. क्रिकेटच्या इतिहासात (Cricket History) प्रथमच थर्ड अंपायरच्या निर्णयाला चॅलेन्ज दिल्याचं दिसून आलंय. त्यामुळे आता रिव्ह्यू सिस्टीमवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.