IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ 2nd T20) यांच्यामध्ये रविवारी टी-20 सीरिजचा दुसरा सामना खेळवला गेला. या लो-स्कोरींग सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्ने (Team India Beat New zealand) विजय मिळवला आहे. या सामन्यानंतर टीम इंडियाचा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी एकमेकांची बातचीत केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या इंटरव्ह्यूमध्ये युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यामध्ये वाद झालेला दिसून आला.
या गंभीरतीशीर संभाषणामध्ये प्रश्न कोण विचारणार यावरून कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यामध्ये वाद झाला. अखेर यामध्ये सूर्यकुमार यादवने या मध्यस्ती करून त्यांचं मजेदार भांडण मिटवलं. हे पाहून चाहते देखील हसू रोखू शकणार नाहीत.
या व्हिडीओची सुरुवात कुलदीप यादवने केली. कुलदीप युपीचा आहे आणि रविवारचा सामना लखनऊमध्ये होता. त्यामुळे हा इंटरव्यू कुलदीपने घेण्यास सुरुवात केली. व्हिडीओची सुरुवात करताना कुलदीप म्हणतो, टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या युझवेंद्र चहलचं अभिनंदन.
यावर युझी उत्तर देतो की, मी नेहमीच भारतासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. याचवेळी कुलदीप यादवने त्याला प्रश्न विचारला आणि तो सूर्यकुमार तिथे आहे, हेच विसरून गेला.
Local lad
Landmark holder
The ever-so-adaptable Mr. 360Laughter, insights & banter unfold as @yuzi_chahal hosts @imkuldeep18 & @surya_14kumar on Chahal TV Lucknow - By @ameyatilak
Full interview #TeamIndia | #INDvNZ https://t.co/5THSbQ4Epi pic.twitter.com/Ic9C32lafm
— BCCI (@BCCI) January 30, 2023
ज्यावर युझवेंद्र चहलने मस्ती सुरु केली आणि म्हणाला, आता मी प्रश्न विचारणार, कारण चहल टीव्ही सुरु झाला आहे. यावेळी तातडीने कुलदीप म्हणाला की, मला विचारू दे, ज्यावर चहल म्हणाला, तू अजून आम्हाला कबाब नाही खायला घातले. सूर्याही म्हणाला, तुझ्या घरच्या मैदानावर सामना सुरु आहे, याचा अर्थ असा नाही की, तु संपूर्ण इंटरव्यू पूर्ण करशील.
टी-20 क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा कुल-चा ची जोडी पहायला मिळाली. टीम इंडियासाठी कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी चांगली कामगिरी केली. चहल आता टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर बनला आहे, त्याचे 75 सामन्यांमध्ये 91 विकेट्स झाले आहेत. याबाबतीत त्याने भुवनेश्वर कुमारला मागे टाकलंय.
भारतीय गोलंदाजांनी रविवारी कमाल केली. एकामागून एक गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या बॉटर्सला तंबूत पाठवलं. पांड्या, सुंदर, चहल, हुड्डा, कुलदीप आणि अर्शदीपने विकेट घेतल्या आणि भारताला पहिल्याच डावात विजयाच्या उंभरठ्यावर आणून ठेवलं. त्यानंतर बाकीचं काम भारतीय फलंदाजांनी पूर्ण केलं. भारताकडून सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सर्वाधिक 26 धावा केल्या. तर ईशान किशनने (Ishan Kishan) 19 धावांची खेळी केली.