अमेरिका

जिलानी अमेरिकेत पाकिस्तानचे नवे राजदूत

अमेरिकेतील पाकिस्तानचे नवे राजदूत म्हणून जलील अब्बास जिलानी यांची नियुक्ती केली गेली आहे. जिलानी यांच्याकडे याआधी परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी होती.

Nov 9, 2013, 05:17 PM IST

पाकनं धुडकावली होती ओबामांची `काश्मीर ऑफर`!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २००९ साली गुप्तरित्या पाकिस्तानसमोर काश्मीरसंबंधी एक प्रस्ताव ठेवला होता.

Nov 6, 2013, 01:00 PM IST

अमेरिकेत मॉलमध्ये पुन्हा गोळीबार...

उत्तर न्यूजर्सी स्थित एक मॉल रात्री बंद होण्याच्या अगदी थोड्यावेळ अगोदर या ठिकाणी गोळीबार झाला. त्यानंतर पोलीस या ठिकाणी या बंदूकधारी गोळीबार करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

Nov 5, 2013, 01:57 PM IST

अमेरिकेकडून याहू, गुगलचा डाटा होतोय हॅक...

जगभरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या याहू आणि गुगल या कंपन्यांचा डाटा सध्या चोरला जातोय आणि ही चोरी केली जातेय ती चक्क अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडून...

Nov 1, 2013, 10:35 PM IST

पहिल्यांदाच अमेरिकेच्या संसदेत दिवाळी!

अमेरिकेच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या कॅपिटॉल हिल्सवर यंदा प्रथमच दिवाळीची आतषबाजी बघायला मिळाली. याबाबत अमेरिकन सिनेट आणि काँग्रेसमध्ये द्विपक्षीय ठराव एकमतानं संमत केल्या नंतर कॅपिटॉल हिल इथं पहिल्यांदाच दिवाळी साजरी करण्याचा कार्यक्रम झाला.

Oct 31, 2013, 03:53 PM IST

अबब...अमेरिकेला विकत घेण्याइतकी पेशव्यांकडे संपत्ती

सध्या उन्नावमध्ये खजिन्याचा शोध सुरू आहे. मात्र या खजिन्यात कुणाची संपत्ती आहे य़ाबाबत जोरदार वादविवाद सुरू आहेत. हा खजिना नानासाहेब पेशव्यांचा असल्याचा दावा अनेक इतिहासतज्ञ करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या खजिन्याच्या तपशीलाचा शोध लागलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Oct 26, 2013, 01:10 PM IST

मुंबई हल्ल्याबाबत बराक ओबामांनी केली नवाज शरीफांची कानऊघडणी

अतिरेक्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चांगलीच कानऊघडणी केली आहे.

Oct 24, 2013, 02:49 PM IST

ओबामा महिलेला आधार देतात तेव्हा…

पाहा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांच्या लांबलचक भाषणाचा काय परिणाम झालाय तो... वॉशिंग्टनमध्ये हेल्थ केअरसंदर्भात बोलत असलेल्या ओबामांच्या भाषणादरम्यान एक महिला चक्कर येता येता वाचलीय.

Oct 22, 2013, 11:34 AM IST

`काश्मीर प्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी करावी`, शरीफांची मागणी भारताला अमान्य

भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेला काश्मीरप्रश्न अमेरिकेच्या मध्यस्थीनं सुटेल, असं मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केलंय.

Oct 21, 2013, 08:26 AM IST

अमेरिकेच्या हिलरी यांना लंडनमध्ये ठोठावला दंड

अमेरिकेच्या माजी प्रथम महिला आणि परराष्ट्रसचिव हिलरी क्लिंटन यांना अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून पाहिले जाते; मात्र ही बाब लंडनमधील वाहतूक पोलीस अधिकार्यारवर कोणताही प्रभाव करू शकलेली नाही. पार्किंगसाठी तिकीट न घेता कार उभी केल्याबद्दल हिलरींना १३० डॉलरचा दंड ठोठावला गेला.

Oct 17, 2013, 03:53 PM IST

अमेरिका ‘शटडाऊन’ संकटातून मुक्त

गेले दोन आठवडे अमेरिकन अर्थसत्तेवर आलंलं आर्थिक संकट दूर झालंय. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटीक पक्षात एकमत झालं असून कर्जाची मर्यादा वाढवण्यास सिनेट सदस्य राजी झालेत. त्यामुळं इतिहासात पहिल्यांदाच ओढवलेल्या आर्थिक संकटातून अमेरिकेची सुटका झालीय.

Oct 17, 2013, 08:36 AM IST

व्हाईट हाऊसजवळ थरार, फायरिंग करून कारमधील महिलेला टिपले

हॉलिवूड चित्रपटातील थरार पाहावा, अशी घटना प्रत्यक्ष रस्त्यावर घडली. व्हाईट हाऊसपासून कॅपिटल हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी फायरिंग करून कार रोखली नाही तर एका महिलेलाही टिपले. त्यामुळे व्हाईट हाऊसजवळ भीतीचा गोळा नागरिकांच्या पोटात उठला.

Oct 4, 2013, 12:01 PM IST

‘शट डाऊन’मुळं अमेरिकेचं होणार मोठं नुकसान - ओबामा

अमेरिकेत झालेल्या शट डाऊनचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर होऊन अमेरिकेचं मोठं नुकसान होण्याची शक्यता राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केलीय. अमेरिकेतल्या सद्य परिस्थितीबाबत रिपब्लिकन पार्टीला जबाबदार असल्याचं ओबामा म्हणाले. ज्यामुळं १० लाख कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर जावं लागलंय.

Oct 2, 2013, 12:00 PM IST

अमेरिकेतलं शट डाऊन म्हणजे काय रे भाऊ?

अध्यक्ष बराक ओबामा यांनी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या महत्वाकांक्षी आरोग्य देखभाल विधयकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमधले मतभेद दूर न झाल्यान अखेर १७ वर्षानंतर अमेरिकेत शट डाऊन करण्यात आलं आहे.

Oct 1, 2013, 11:41 AM IST

अमेरिकेवर शट डाऊनचं संकट!

अमेरिकेची अर्थव्यवस्था ठप्प होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालीये. महासत्ता आर्थिक संकटात सापडलीये. अध्यक्ष बराक ओबामा यांच्या महत्वकांक्षी आरोग्य देखभाल विधयकाला रिपब्लिकनांचा विरोध सुरुच असल्यानं अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीये.

Oct 1, 2013, 09:01 AM IST