अमेरिका

पंतप्रधान डॉ. सिंग-बराक ओबामा यांची होणार भेट

भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पुढील महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. ते व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहे. दोन्ही देशांमधील संबंध वाढविण्याबाबत ते चर्चा करतील. २७ सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये ही भेट होणार आहे.

Aug 21, 2013, 03:17 PM IST

३३०० फूट उंचावरून महिलांचा स्टंट

डरके आगे जित है... या वाक्याची प्रचिती कॅलिफोर्नियातल्या योसमित नॅशनल पार्कमध्ये आलीय... कॅलिफोर्नियातल्या योसमित नॅशनल पार्कच्या पहाडावर जमिनीपासून तब्बल ३३०० फूट उंच पहाडावरून दोरीवर चालण्याचा विक्रम दोन महिलांनी केलाय.

Aug 13, 2013, 02:24 PM IST

हल्ल्याची शक्यता, पाकमधून अमेरिकन दुतावास माघारी

अमेरिकेन व्हाईट हाऊस हल्यानंतर अतिरेकी हल्ल्याची मनात जास्तच भीती घेतल्याचे दिसून येत आहे. अतिरेक्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानमधील अमेरिकन दुतावासातील सर्व अधिकाऱ्यांना मायदेशी बोलावले आहे.

Aug 9, 2013, 11:09 AM IST

पाक दहशतवादी बहावल खानवर अमेरिकेची बंदी

अफगानिस्तान आणि पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी झालेला पाकिस्तानी दहशतवादी नेता बहावल खान याच्यावर अमेरिकेने बंदी लादली आहे.

Aug 7, 2013, 03:02 PM IST

कामाठीपुऱ्यातल्या श्वेतानं घेतली उंच भरारी!

मुंबईतल्या कामाठीपुऱ्यात राहणारी श्वेता कट्टी अखेर गुरूवारी न्यूयॉर्कला रवाना झालीय. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची १८ वर्षीय ही मुलगी शिक्षणासाठी थेट सातासमुद्रापार गेलीय. अमेरिकेतल्या शिक्षणासाठी तिला स्कॉलरशिप मिळालीय.

Aug 5, 2013, 12:47 PM IST

मोदींना व्हिसा देऊ नका, खासदारांचे ओबामांना पत्र

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे लोकसभा निवडणूक प्रचार समिती प्रमुख नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा व्हिसा कसा मिळणार नाही, याची मोर्चेबांधणी विरोधकांनी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतातील काही खासदारांनी अध्यक्ष बराक ओबामा यांना पत्र पाठविले आहे. यावर या खादसारांच्या सह्या आहेत.

Jul 24, 2013, 03:58 PM IST

अमेरिकन महिलेचा मांजरासोबत सेक्स

अमेरिकेतील एका २३ वर्षीय युवतीने बोक्याबरोबर (मांजर) सेक्स केल्याची घटना पुढे आली आहे. ओकलाहोमा शहरात राहणाऱ्या क्रिस्टिना ब्राऊन या महिलाला पोलिसांनी अटक केली. तसेच तिला दंडही ठोठावण्यात आला आहे.

Jul 19, 2013, 10:11 AM IST

ओबामांनी दिल्या नेल्सन मंडेलांना वाढदिवसाच्या शुभेच्या!

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नेल्सन मंडेलांना ९५ व्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या. माझे कुटुंब आणि अमेरिकेच्या तमाम जनतेकडून मिशेल आणि मी नेल्सन मंडेला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.

Jul 18, 2013, 02:55 PM IST

अमेरिकेत ‘भाग मिल्खा भाग’ सुसाट

प्रसिद्ध भारतीय धावपटू मिल्खा सिंग याच्या जीवनावर आधारित असा ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट अमेरिकेत सुसाट वेगात धावतोय.

Jul 17, 2013, 06:45 PM IST

स्नोडेन व्हेनेझुएलाला आश्रय घेण्यास तयार?

अमेरिकेच्या गुप्त कारवाया उघड केल्याप्रकरणी तसंच अनेक गोपनीय दस्तावेज जाहीर करणारा स्नोडेन अखेर व्हेनेझुएलामध्ये राजनैतिक शरण जायला तयार झालाय अशी माहिती रशियन संसदेने पुरवलीय.

Jul 10, 2013, 02:47 PM IST

अमेरिकेत विमान दुर्घटना, २ ठार, १८० जखमी

दक्षिण कोरियाच्या एशियाना एअरलाईन्सचं विमान अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर उतरत असताना क्रॅश झालंय. यामुळे प्रवाशांना इमर्जन्सी एक्झिटमधून बाहेर पडावं लागलं

Jul 7, 2013, 05:00 PM IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव वधारला

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल १०२ डॉलरपर्यंत पोहोचलाय. इजिप्तमधून तेलाचा घटलेला पुरवठा आणि अमेरिकेतली वाढलेली तेलाची मागणी याचा परिणाम तेलाच्या दरांवर झालाय.

Jul 4, 2013, 11:41 AM IST

२४ लाख भारतीय आता अमेरिकन नागरिक

अमेरिकेच्या काही सर्वोच्च नियामक मंडळाने परदेशातून कायमचे वास्तव करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी एक बिल तयार केले आहे. हे विधेयक राष्ट्रध्यक्षाकडून संमत झाले तर २४ लाख भारतीयांसोबत १.१ करोड लोकांना अमेरिकन नागरिकत्व प्राप्त होऊ शकते.

Jun 28, 2013, 04:35 PM IST

हिटलरच्या सहकाऱ्याच्या डायरीत काय दडलंय?

जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलर हा वादग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्याच्या जवळच्या सहकाऱ्याची डायरी सापडलेय. या डायरीत काय दडलंय, याची तपासणी करण्यासाठी डायरी हस्तगत करण्यात आलेय.

Jun 11, 2013, 03:55 PM IST

`वॉलमार्ट` दोषी; ११ करोड डॉलर्सची नुकसान भरपाई!

अगोदर ‘लॉबिंग’च्या चक्रव्युहात फसलेल्या अमेरिकन रिटेल कंपनी ‘वॉलमार्ट’ समोरच्या अडचणी वाढतच चालल्यात.

May 30, 2013, 07:30 PM IST