इंधन दरवाढीविरोधात तापलं वातावरण...
इंधन दरवाढीला देशभरात विरोध सुरू झालाय. पंजाबमध्ये लुधियाना आणि अमृतसर इथं जोरदार निदर्शनं सुरू आहेत. विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्या गेलेल्या गुजरातमध्येही या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन सुरू झालंय.
Sep 14, 2012, 01:19 PM ISTकुडनकुलम अणुप्रकल्पाविरोधात समुद्रात आंदोलन
तामिळनाडुतल्या कुडनकुलममधल्या अणुप्रकल्पाविरोधात इथल्या नागरिकांनी जल आंदोलन सुरू केलं आहे. अणूप्रकल्पापासून चार किलोमीटर अंतरावर समुद्रात हे आंदोलन सुरू आहे.
Sep 13, 2012, 05:45 PM IST‘व्हॉयलन्स' ऑफ मुस्लिम : जाळपोळ आणि तोडफोड
प्रेषित मोहम्मीद पैगंबर यांच्यावर आधारित ‘इनोसन्स ऑफ मुस्लिम’ या अमेरिकन फिल्मचा वाद अजून काही क्षमण्याची चिन्हं दिसत नाहीत. आजही वेगवेगळ्या मुस्लिम राष्ट्रांत या फिल्मचा निषेध नोंदवला गेला. यावेळी या आंदोलनांना हिंसेचं वळण लागलंय.
Sep 13, 2012, 04:27 PM ISTराज ठाकरेंच मराठी नंतर ‘नवं हिंदुत्व कार्ड’
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या मुंबईत होणा-या मोर्चाचं राजकीय दृष्ट्याही वेगळं महत्व आहे.
Aug 20, 2012, 08:09 PM IST'पंतप्रधान हे वैयक्तिक पद नव्हे'
बाबा रामदेव यांच्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी बाबांनी आपलं उपोषण मागे घेत आहेत. आंबेडकर मैदानात समर्थकांसमोर `पंतप्रधान हे वैयक्तिक पद नव्हे` असं म्हणत बाबांनी पंतप्रधानांवर घणाघात केलाय.
Aug 14, 2012, 01:47 PM ISTबाबांच्या उपोषणाला थोड्याच वेळात ‘पूर्णविराम’
योग गुरू बाबा रामदेव आपलं उपोषण आज समाप्त करणार आहेत. काळ्या धनाविरोधात बाबांनी रामलीला मैदानावर सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. सकाळी ११ वाजता आपण या उपोषणाला पूर्णविराम देण्याची घोषणा बाबा रामदेव यांनी केलीय.
Aug 14, 2012, 09:53 AM ISTअण्णा आले, गर्दीही आली!
जनलोकपालच्या आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाईच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून सकाळपासूनच उपोषणाला सुरूवात केलीय. अण्णांनी सरकारला दिलेला चार दिवसांचा अल्टिमेटम आता संपलाय त्यामुळे अण्णाही टीम अण्णासोबत उपोषणात सहभागी झालेत.
Jul 29, 2012, 12:34 PM ISTअण्णा आजपासून बसणार उपोषणाला...
अण्णांकडून सरकारला दिला गेलेला चार दिवसांचा अल्टिमेटम आता संपलाय. त्यामुळे दिल्लीत जंतरमंतरवर आजपासून अण्णा हजारे उपोषण सुरू करणार आहेत.
Jul 29, 2012, 09:48 AM ISTगर्दी नको तर दर्दी हवेत - अण्णा हजारे
अण्णा हजारेंनी आपल्या भाषणात ‘गर्दी नको दर्दी लोक पाहिजेत’ असं म्हणत लोकपाल बिलाविषयी सरकारच्या उदासिनतेवर टिका केलीय. सरकारकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचं अण्णांनी यावेळी सांगितलंय. आम्ही कोणतीही निवडणूक लढवणार नाही, ना कोणता पक्ष काढणार... लोकपाल बिलासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचंही अण्णांनी म्हटलंय.
Jul 28, 2012, 02:20 PM ISTटीम अण्णांच्या आंदोलनात बाबांचं 'जंतरमंतर'
आज टीम अण्णांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस. काही प्रमाणात थंड पडलेल्या या आंदोलनाला रामदेव बाबांनी ‘जंतरमंतर’वर हजेरी लावून ऊर्जा मिळवून दिली.
Jul 27, 2012, 04:42 PM ISTआंदोलनाची ठिणगी पुन्हा पेटली...
जैतापुरात अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलनाची थिनगीनं पुन्हा एकदा पेट घेतलाय. शिवसेनेच्या मदतीनं स्थागिक ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी घुसून सामूदायिक शेती आंदोलन सुरू केलंय. हजारो प्रकल्पग्रस्त आपल्या जनावरांसह रस्त्यावर उतरलेत.
Jun 13, 2012, 12:40 PM ISTराज गर्जनेनंतर, मनसेची राज्यभर टोल’धाड’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टोलविरोधी विधानानंतर मुंबईतून सुरु झालेल्या आंदोलनाचं लोण राज्यभर पसरतंय. बुलढाण्यातही मनसैनिकांनी टोलनाक्यावर तोडफोड केलीय.. दुसरबीड टोलनाक्यावर मनसैनिकांनी हल्लाबोल केलाय. यावेळी 15 ते 20 मनसे कार्यकर्त्यांना अटक केलीय.
Jun 13, 2012, 12:26 PM ISTशेतकरी संघटनांचा आंदोलनाचा इशारा
विविध फळं, भाजी आणि मासाल्यांवरचं नियमन रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं शेतकरी संघटनांनी स्वागत केलंय. पण सरकारन हा निर्णय घेताल्यानंतर परत त्यावर हरकती मागावाल्यात. त्याला संघटनांनी जोरदार विरोध केलाय. त्याचबरोबर आंदोलनाचा इशारा दिलाय.
Apr 25, 2012, 05:31 PM ISTगिरणीसाठी कामगारांचा रस्त्यावर ठिय्या!
www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या युनायटेड मिलमध्ये गिरणी कामगारांनी घुसण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी सातशे आंदोलक गिरणी कामगारांना अटक केलीये. पण या गिरणी कामगारांनी जामीन नाकारलाय आणि ठिय्या आंदोलन सुरू केलंय.
Mar 1, 2012, 09:32 PM IST
बस ड्रायव्हरला मारहाण
बसला कारचा धक्का लागल्यानं कारचालकासह चौघांनी बसचालक वामन अहिरेंना गाडीतून ओढून बेदम मारहाण केली. यावेळी बसमधील एकही प्रवासी अहिरे यांच्या मदतीला धावला नाही.
Feb 27, 2012, 07:58 AM IST