इराक

इराकमधील 46 नर्स सुरक्षित, सरकारचा दावा

 इराकमध्ये अडकून पडलेल्या ४६ भारतीय नर्सचा सुटकेचा मार्ग अवघड असल्याचेच सष्ट झाले आहे. 'आयएसआयएस' या दहशतवाद्यांच्या संघटनेने सर्व नर्सना अज्ञातस्थळी हलविले आहे. या ठिकाणी बॉम्बवर्षाव होत असून काही नर्स जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर सरकारकडून त्या सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Jul 4, 2014, 09:05 AM IST

ISISनं हॉस्पिटल उडवलं, 5 भारतीय नर्स जखमी- रिपोर्ट

इराकमध्ये अडकलेल्या 46 नर्सेसच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. तिरकीत या शहरात अडकून पडलेल्या या नर्सेसना अन्यत्र हलवलं गेलंय. तसंच त्या इसिस या अतिरेकी संघटनेच्या ताब्यात असल्याची शक्यता निर्माण झालीये. 

Jul 3, 2014, 05:16 PM IST

इराकमध्ये केरळच्या 46 नर्स फसल्यात

 इराकमधील तिकरित शहरात एका हॉस्पीटलमध्ये 46 भारतीय नर्सना दहशतवाद्यांनी बंद केले आहे. आयएसईएस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक)ने एक बस बाहेर काढण्यासाठी पाठविली होती. मात्र, या बसमध्ये बसण्यास नकार दिलाय.

Jul 3, 2014, 02:31 PM IST

इराकमधील भारतीयांसाठी भारताची लष्करी तयारी सुरू

इराकमधली सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारनं आपली लष्करी तयारी सुरू केलीय. आयएनएस म्हैसूर आणि आयएनएस तर्कष या दोन युद्धनौका पर्शियन गल्फमध्ये तैनात केल्या आहेत.

Jun 29, 2014, 02:50 PM IST

इराकमध्ये लातूरचे 4 तरुण अडकलेत

 इराकमध्ये सुरु असलेल्या संघर्षाची झळ आता महाराष्ट्रालाही जाणवू लागलीय. इराकच्या बसरा शहरात लातूर जिल्ह्यातले 4 तरुण अडकून पडलेत. निलंगा तालुक्यातले हे चारही तरुण असून त्यांची सुटका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. 

Jun 26, 2014, 09:38 PM IST

इराकमध्ये 17 दिवसांत एक हजार जणांचा मृत्यू

इराकमध्ये बंडखोरांकडून दोन शहरांवर ताबा मिळाविल्यानंत बगदादच्या दिशेने कूच केली होती. त्यानंतर झालेल्या संघर्षातून आतापर्यंत हजारो नागरिकांचे बळी गेलेत. इराकमधील वेगवेगळ्या भागांमध्ये बंडखोरांकडून करण्यात आलेल्या हल्लात 1075 जणांची हत्या केली गेल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.

Jun 25, 2014, 04:46 PM IST

EXCLUSIVE व्हिडिओ : इराकमध्ये फसलेले भारतीय

इराकमध्ये सुरु असलेल्या यादवी युद्धात अनेक जण भरडले जात आहेत. इराकच्या बसरा शहरात नोकरीच्या शोधात गेलेल्या काही भारतीयांचाही यामध्ये समावेश आहे... याच काही इथं फसलेल्या भारतीयांचा पहिला व्हिडिओ `झी मीडिया`च्या हाती लागलाय.

Jun 21, 2014, 12:06 PM IST

गरज भासल्यास इराकमध्ये सैन्य घुसवू - अमेरिका

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराक प्रश्नी मौन सोडलंय. परिस्थितीचा आढावा घेऊन गरजेनुसार कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलंय. गरज पडली तरच इराकमध्ये सैन्य पाठवलं जाईल मात्र पुन्हा युद्ध व्हावं अशी आमची इच्छा नाही, असंही ते म्हणालेत.

Jun 20, 2014, 03:49 PM IST

दुबईत नोकरीची स्वप्न पाहणारे तरुण पोहचले `इराक`मध्ये!

पंजाबच्या अनेक भागांतून परदेशात नोकरी करण्याची इच्छा बाळगणारे जवळपास 40 पंजाबी युवक आधीच पेटलेल्या इराकमध्ये पोहचलेत

Jun 20, 2014, 01:52 PM IST

इराक यादवी :अपहृत 40 भारतीयांपैकी एक पळून जाण्यात यशस्वी

मीडिया रिपोर्टनं केलेल्या दाव्यानुसार, इराकमध्ये अपहरण करण्यात आलेल्या 40 भारतीयांपैकी एक व्यक्ती दहशतवाद्यांच्या तावडीतून स्वत:ची सोडवणूक करण्यात यशस्वी झालाय.

Jun 20, 2014, 01:02 PM IST

डॉक्टर, मौलवी की क्रूरकर्मा... कोण आहे बगदादी?

‘आयएसआयएस’चा प्रमुख अबू बक्र अल बगदादी जगातला मोस्ट वॉण्टेड दहशतवादी बनलाय. कोण आहे हा बगदादी? कसा बनला तो जगात सर्वात मोठा क्रुरकर्मा?

Jun 19, 2014, 01:29 PM IST