दुष्काळ

दुष्काळामुळे लांबली गावांमधली लग्नं

मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती भयाण आहे. मुलींच्या लग्नासाठीही लोकांकडे पैसे नाहीत. त्यामुळं यावर्षी होणारं लग्न आता पुढं ढकलण्याची वेळ जालना जिल्ह्यातील शेतक-यांवर आली आहे.

Jan 3, 2013, 06:56 PM IST

दुष्काळाने घेतला लहानग्याचा बळी

दुष्काळानं परिसीमा गाठली आहे. दुष्काळ आता थेट जीवावरच उठलाय. औरंगाबाद जिल्ह्यात लाडसावंगी गावात दुष्काळानं एका 13 वर्षीय मुलाचा बळी घेतलाय.

Dec 31, 2012, 08:51 PM IST

शेतकऱ्यांसाठी शासनाचा वैरण विकास कार्यक्रम

दुष्काळी तालुक्यामध्ये चारा टंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने वैरण विकास कार्यक्रमावर जोर दिला आहे. धुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना मका, ज्वारी अशा वैविध्यपूर्ण वैरण पिकांचं बियाणं मोफत देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे चाऱ्याची समस्या बऱ्याच अंशी सुटण्यास मदत होणार आहे.

Oct 23, 2012, 09:13 AM IST

केंद्राच्या मदतीतही ‘दुष्काळ’! राज्य सरकार तोंडावर...

दोन दिवस पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिगटाशी झालेल्या चर्चांमध्ये प्रस्ताव ठेवण्यात आले. मात्र, त्यावर तातडीने निर्णय झालेला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या पदरी निराशा आलीय. यातून राज्य सरकारचा आततायीपणा पुन्हा एकदा समोर आलाय.

Aug 26, 2012, 10:46 AM IST

राज्याला केंद्राकडून मिळेल मदत - मुख्यमंत्री

दुष्काळ निवारणासाठी राज्याला सर्वोतोपरी मदत दिली जाईल, असं आश्वासन दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आलय. यासंदर्भात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत बैठक दिल्लीत पार पडली.

Aug 25, 2012, 11:54 AM IST

आकडे दुष्काळी, त्यात जनतेचा बळी

पावसाच्या आकडेवारीवरून राज्य सरकारनं दुष्काळी तालुक्याची घोषणा केली. मात्र धुळे जिल्ह्यात याच आकडेवारीच्या सावळ्या गोंधळामुळे साक्री तालुक्याला राज्य सरकारच्या मदतीपासून वंचित रहावं लागलंय. या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतांनाही प्रशासनानं दिलेल्या चुकीच्या आकडेवारीच्या खेळात जनतेचा बळी गेलाय.

Aug 24, 2012, 07:30 PM IST

महाराष्ट्रातील ६८ तालुके दुष्काळग्रस्त!

राज्यातले ६८ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात येणार आहेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आणि पेरणी झालेले तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त भागात करण्यात येईल.

Aug 17, 2012, 01:51 PM IST

दुष्काळी भागात पाण्यासाठीही लाच!

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावात टॅंकर लावण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या आटपाडीच्या महसूल विभागातील कारकून आणि तलाठयाला अटक करण्यात आलीय.

Aug 8, 2012, 11:24 PM IST

दुष्काळावरील मुकाबल्यासाठी मंत्र्यांची बैठक

देशात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी केंद्राच्या विशेष मंत्रिगटाची बैठक होतेय. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

Jul 31, 2012, 12:15 PM IST

पावसासाठी... बेडकाचं अन् गाढवाचं लग्न

राज्यात मान्सून बरसला असला तरी काही भाग मात्र अजूनही कोरडाच आहे. सोलापूरमध्येही पावसाची वाट पाहतोय. पाऊस पडावा यासाठी शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रयत्नही सुरू आहेत. यातलाच एक प्रयत्न म्हणजे बेडकाचं लग्न... अगदी साग्रसंगीत पद्धतीनं तब्बल तीन दिवस हा सोहळा पार पडला.

Jul 13, 2012, 04:21 PM IST

‘अग्निपरिक्षेनंतर’ सरकारला दुष्काळाचे चटके?

अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालयाच्या आगीच्या मुद्यावर सरकारची अग्निपरीक्षा झाली. मात्र, आजपासून सरकारला दुष्काळाचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता आहे.

Jul 11, 2012, 10:35 AM IST

रेशनकार्ड मान्य, पण मिळत नाही धान्य

राज्यात दुष्काळामुळं जनता त्रासलीय. पाण्यासाठी सुरू असलेली वणवण असह्य झालेल्या अनेकांनी मुंबईची वाट धरलीय. पण इथेही त्यांच्या नशिबी अवहेलनाच आलीय. दुष्काळाला कंटाळून नवी मुंबईत आलेल्या लोकांना शासनान रेशनकार्ड दिलं खरं पण त्या कार्डावर धान्यच मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे.

Jun 5, 2012, 09:22 AM IST

दुष्काळात नेत्यांचा भार...

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात दुष्काळाचं दुष्टचक्र सुरूच आहे. आणि त्यातच इथले लोकप्रतिनिधीही स्वत:चीच तुमडी भरत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे लोकप्रतिनिधी तुपाशी आणि गावकरी मात्र उपाशी असं म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.

Jun 3, 2012, 01:19 PM IST

दुष्काळग्रस्तांसमोर कासारे गावाचा आदर्श

दुष्काळात होरपळणा-या राज्यातल्या शेकडो गावांसाठी अहमदनगरच्या कासारे गावानं आदर्श निर्माण केलाय. जलव्यवस्थापनाच्या जोरावर या गावानं पाणीटंचाईवर मात केलीये. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक गावांत पाण्यासाठी भटकंती सुरु असताना कासारे गाव 'सुजलाम सुफलाम' आहे.

May 26, 2012, 08:06 AM IST

'कोंडाण्या'बरोबर नागरिकही राहिले कोरडेच!

प्रकल्पाच्या मूळ किंमतीत भरमसाठ वाढ झाल्यानंतर कोंडाणे धरण प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय पण, त्यात स्थानिक मात्र नाहक भरडले जात आहेत.

May 18, 2012, 01:34 PM IST