देवेंद्र फडणवीस

पितृपक्षाचे कावळे उडाले... सेनेनं सामनातून भाजपवर डागली तोफ!

महायुती तुटल्यानंतर शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपवर चांगलंच तोंडसूख घेतलंय. भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलंय. शिवसेना-भाजप युती राहावी असे आमच्यातील मित्रपक्षांना वाटत होते. त्यापेक्षाही महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेची ती भावना होती. या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे दुश्मनच म्हणायला हवेत, या शब्दात शिवसेनेनं आपली तिखट प्रतिक्रिया दिलीय. 

Sep 26, 2014, 08:37 AM IST

शिवसेनेनं योग्य सन्मान राखला नाही - भाजप

शिवसेनेनं योग्य सन्मान राखला नाही - भाजप

Sep 25, 2014, 04:33 PM IST

शिवसेनेकडून योग्य प्रस्ताव नाही - भाजप

शिवसेनेच्यावतीनं वेगवेगळे प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यावर विचार केला जातोय. मित्रपक्ष आणि आम्हांला जसं सामावून घेतलं पाहिजे, ते अजूनही आले नाहीयेत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

Sep 25, 2014, 04:11 PM IST

शिवसेनेशी चर्चा नाही, भाजपचा अंतिम निर्णय - फडणवीस

आता यापुढे शिवसेनेशी चर्चा नाही, भाजपचा अंतिम निर्णय झालाय आहे. त्यामुळे सेनेशी चर्चा करणार नाही, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. त्यामुळे  २५ वर्षांची अभेद्य युती संपुष्टात आली आहे. केवळ घोषणा होण्याचे बाकी आहे.

Sep 22, 2014, 11:55 AM IST

उद्धव यांची माथूर ऐवजी फडणवीस घेणार भेट

राज्यातील महायुतीतील गुंता अधिकच वाढला आहे. गेल्या २५ वर्षांतील युती तुटीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, भाजपचे निवडणूक प्रभारी ओम प्रकाश माथून हे आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र, यात बदल करण्यात आला असून प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस ठाकरे यांची भेट घेणार आहे.  परंतु शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. युतीवाचविण्यासाठी धडपड सुरू आहे.

Sep 22, 2014, 10:38 AM IST

युती कायम राहणार - सेना, निर्णयाचा चेंडू सेनेकडे - भाजप

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या मुद्दा अजूनही कायम आहे. मात्र, शिवसेना आणि भाजप युती कायम राहणार असल्याची माहिती शुक्रवारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. दरम्यान, आम्ही युतीबाबत निर्णयचा चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Sep 19, 2014, 09:04 PM IST

'छत्रपती कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही'- फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज ही कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असा खणखणीत टोला भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय. झी २४ तासला दिलेल्या  खास मुलाखतीत फडणवीसांनी स्पष्ट केलंय.   

Sep 15, 2014, 07:59 PM IST