निवडणूक आयोग

बप्पी लहरींपेक्षा त्यांच्या बायकोकडे अधिक सोने

सोने आणि बप्पी लहरी यांचे प्रेम आपण सर्वजण जाणतो. नेहमी सोन्याच्या मोठ-मोठ्या चेन गळ्यात घालणारे बप्पीदा मात्र सोन्याच्याबाबतीत आपल्या पत्नीपेक्षा गरीब आहेत. बप्पीदांकड़े सुमारे १२ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तसेच बीएमडब्ल्यू आणि ऑडीसह पाच कारचे मालक आहेत.

Apr 11, 2014, 01:16 PM IST

महिलांनी मोदींवर आता विश्वास कसा ठेवायचा - दिग्विजय सिंह

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी निवडणूक आयोगासमोर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यात आपलं लग्न झालं असल्याचं नमूद केलं. पहिल्यांदाच जशोदाबेन आपली पत्नी असल्याचं मोदींनी सांगितलंय. त्यांच्या या माहितीनंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरून टिका केलीय. दिग्विजय सिंह म्हणाले, की "मोदींच्या या कबुलीनंतर देशातील महिला काय मोदींवर विश्वास ठेवू शकतील".

Apr 10, 2014, 12:26 PM IST

ममता बॅनर्जी अखेर निवडणूक आयोगासमोर झुकल्या

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची स्थिती निर्माण झाली होती, मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर निवडणूक आयोगाचे आदेश मानले आहेत.

Apr 9, 2014, 08:38 AM IST

निवडणूक आयोग की रबर स्टॅम्प?

शेषन यांनी निवडणूक आयोग म्हणजे रबर स्टॅम्प नव्हे, तर दरारा असलेला सिंह असल्याचं दाखवून दिलं... पण काळाच्या ओघात राजकीय नेते आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला रबर स्टॅम्प समजू लागलेत की काय... असा प्रश्न आता निर्माण झालाय.

Apr 9, 2014, 08:34 AM IST

बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची शक्यता

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची शक्यता आहे. जर तृणमूल काँग्रेस आणि निवडणूक आयोग यांच्यात या विषयावर सकारात्मक चर्चा झाली नाही, तर निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं सांगण्यात येत आहे.पश्चिम बंगालमध्ये निवडणुका रद्द होण्याची शक्यता

Apr 8, 2014, 04:01 PM IST

अमित शहांच्या भाषणाची निवडणूक आयोग करणार चौकशी

भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी आणि नरेंद्र मोदी यांचा उजवा हात असलेले अमित शहा चांगलेच अडचणीत आले आहेत. `ही निवडणूक अपमानाचा बदला घेण्याची संधी आहे,` या प्रक्षोभक वक्तव्याची राज्य निवडणूक आयोगानं दखल घेतली असून शहा यांच्या भाषणाची सीडी मागवली आहे.

Apr 6, 2014, 05:45 PM IST

हेमा मालिनीवर निवडणूक आयोग नाराज

अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हेमा मालिनी पुन्हा अडणीत आल्यात. निवडणूक आयोगांने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याआधी त्यांनी आचारसंहिता भंग केली होती. त्याप्रकणी गु्न्हाही नोंदविण्यात आला होता.

Apr 5, 2014, 01:28 PM IST

आमीर खानचं निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण

कोणत्याही राजकीय पक्षाला आपला पाठिंबा नसल्याचं आमीर खानने निवडणूक आयोगाला पत्र लिहून सांगितलं आहे.

Mar 28, 2014, 05:18 PM IST

वक्तव्याबद्दल खेद, विषय इथंच संपवा - शरद पवार

दोनदा मतदान करा, या वादग्रस्त विधानाप्रकरणी शरद पवारांनी निवडणूक आयोगाला उत्तर दिलंय. माझ्या वक्तव्याबद्दल झालेल्या गोंधळामुळे मी खेद व्यक्त करतोय. तसंच हा विषय इथेच संपवावा, अशी विनंती शरद पवारांनी केलीय.

Mar 26, 2014, 07:22 PM IST

आमिर बनला निवडणूक आयोगाचा `नॅशनल आयकॉन`

निवडणूक आयोगानं बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला नॅशनल आयकॉन म्हणून निवडलंय. आमिर भारतीय निवडणूक आयोगाच्या एका जाहिरातीत काम करताना दिसणार आहे.

Mar 20, 2014, 10:28 AM IST

केजरीवालांच्या निवडणूक लढवण्यावर येणार बंदी?

अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या तीन नेत्यांवर निवडणूक आयोगाची टांगती तलवार आहे. निवडणुकीत अधिक खर्च केल्याची तक्रार दिल्ली निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. आयोगाच्या तीन सदस्यीय समितीनं आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा केलाय.

Mar 6, 2014, 11:04 AM IST

निवडणूक आयोग उद्या लोकसभेचं रणशिंग फुंकणार

लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा होणार आहे. निवडणूक आयोगाची उद्या सकाळी साडे दहा वाजता पत्रकार परिषद आहे.

Mar 4, 2014, 07:47 PM IST

गोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा

भाजपचे नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा मिळाला आहे. मुंडेनी केलेल्या वक्तव्यानंतर असे विधान करण्याबाबत खबरदारी घ्या, असे बजावले. मुंडेने केलेला खुलासा ग्राह्यधरून निवडणूक आयोगाने मुंडे यांना बजावून कारावाईतून सुटका केली.

Dec 11, 2013, 02:49 PM IST

राजस्थानमध्ये ७४.३८ टक्के मतदान, दोन ठिकाणी गोळीबार

राजस्थानमध्ये २०० पैकी १९९ जागांसाठी आज मतदान पार पडलं. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशनंतर राजस्थानातही मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. राजस्थानात ७४.३८ टक्के मतदान नोंदवण्यात आलं.

Dec 1, 2013, 07:57 PM IST

‘खूनी पंजा’मुळं मोदी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस

काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा उल्लेख खूनी पंजा असा केल्याबद्दल निवडणूक आयोगानं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना नोटीस बजावलीये. १६ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश आयोगानं दिलेत. मोदींच्या टीकेनंतर काँग्रेसनं आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार केली होती.

Nov 13, 2013, 08:31 PM IST