नोकरी

स्टेट बॅंकेत १९ हजार पदांची भरती

बॅंकेत नोकरी करणाऱ्यांसाठी एक खूश खबर आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये सर्वात मोठी भरती होत आहे. तब्बल १९ हजार पदांची भरती होणार आहे.

Jun 12, 2013, 02:06 PM IST

सरकारी नोकरीत मराठी मुलांचा होतोय छळ!

मुंबईतील परळच्या एमजीएम हॉस्पीटलच्या बाहेर उभ्या असलेल्या 36 मराठी मुलांची सरकारी नोकरी सध्या धोक्यात आलीय. विशेष म्हणजे त्यांच्या नोकरीवर गदा आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत ते हॉस्पीटल प्रशासन आणि तेथील जुने कर्मचारी.

May 22, 2013, 04:41 PM IST

पोलीस भरतीत परप्रांतीयांना `रेड कार्पेट`, मनसे संतापली!

पोलीस दलात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारनं चांगलाच धक्का दिलाय. पोलीस दलात नोकरीसाठी आवश्यक असणारी डोमिसाईलची अट रद्द करण्यात आलीय.

May 17, 2013, 05:36 PM IST

मिळवा तुमच्या मनासारखी नोकरी...

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, हरएक प्रयत्न करून झाला असेल, तरीही मनासारखी नोकरी मिळाली नसेल तर फारशी काळजी करण्याची गरज नाही. तंत्र-विज्ञानाच्या साहाय्यानं तुम्ही तुमची ही अडचण दूर करू शकता...

May 14, 2013, 07:58 AM IST

सरकारी रोजगार केंद्रांनाच घरघर!

सुशिक्षित बरोजगारांना नोकरी मिळावी, त्यांना नोकरीबाबत मार्गदर्शन करता यावं म्हणून राज्य सरकारतर्फे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्र स्थापन करण्यात आलंय. मात्र सध्याच्या स्पर्धेच्या युगात आता या रोजगार केंद्रांना घरघर लागलीय.

May 6, 2013, 05:48 PM IST

LIC सुरू करणार देशातील सर्वांत मोठी बँक

LIC म्हणजेच भारतीय जीवन विमा महामंडळ आता देशातील सर्वांत मोठी बँक स्थापन करणार आहे. एलआयसी देशात सर्वाधिक मोठं जाळं असणारी बँक सुरू करणार आहे. LIC ने जर बँक सुरू केली, तर देशभरात १ लाखाहून अधिक नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

Apr 21, 2013, 10:28 PM IST

तिहार जेलमध्ये `कँपस प्लेसमेंट`

तिहार जेलमध्ये कँपस प्लेसमेंट सुरू केल्या गेल्या आहेत. यामध्ये २४ कंपन्या ३० कैद्यांना नोकरीसाठी भरती करुन घेणार आहेत.

Apr 9, 2013, 04:26 PM IST

पहा काय आहे तुमच्या नोकरीस घातक

नोकरीमध्ये बऱ्याचदा आपल्याला यश मिळत नाही. अनेकदा मानसिक तणावाखाली आपण वावरत असता. आणि त्यामुळे नोकरीतील आपले चित्त अस्थिर असते.

Apr 3, 2013, 09:34 AM IST

भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी...

भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण सतरा पदं भरण्यात येणार आहे. त्यामुळे तटरक्षक दलात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरूणांना नक्कीच सुवर्ण संधी आहे.

Mar 15, 2013, 10:44 PM IST

फेसबुक, ट्विटरमुळे अनेकांनी गमावली नोकरी

फेसबुक म्हणजे आज तरूणाईचा जीव की प्राण झाला आहे. ती ऑनलाईन आली असेल का, तो आता ऑनलाईन आलाच असेल असं म्हणतं ऑफिस गाठताच पहिले लॉग इन करतात ते आपलं फेसबुक.

Nov 30, 2012, 09:57 PM IST

दादांचा वादा... नोकरी नाहीच, आश्वासनं ज्यादा

मावळ गोळीबारात ज्या शेतक-यांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं होतं. मावळ गोळीबाराला उद्या वर्ष पूर्ण होतंय. पण अजूनही हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही. महापालिकेनं या संदर्भातला चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात ढकललाय.

Aug 9, 2012, 09:35 PM IST

नोकरीतील तणावामुळे येतं अकाली वृद्धत्व

नोकरीच्या ठिकाणी ताण तणावपूर्ण वातावरण असेल, तर काम करणाऱ्या लोकांना कमी वयातच वृद्धत्व येतं असं एका संशोधनात स्पष्ट झालं आहे. शारीरिक कमजोरीचंही तणाव हेच कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

Jul 31, 2012, 10:43 AM IST

नोकरीचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा

नोकरीच्या आमिष दाखवून लोकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्याला लोकांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हरिदास वाघमारे असे या भामट्याचे नाव आहे. वाघमारेने सुमारे ८० लोकांना लाखोचा गंडा घातलाय. बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Jun 1, 2012, 10:55 PM IST

१० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या

आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) २०१२ मध्ये जागतिक श्रम बाजारातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही परिस्थिती अत्यंत निराशाजनक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आयएलओच्या मते येत्या १० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या निर्माण करण्याची गरज आहे.

Jan 24, 2012, 07:06 PM IST

भारताला ५ लाख नोकऱ्यांचं गिफ्ट

नव्या वर्षात एक खूशखबर. तरूणांना नवनव्या क्षेत्रात गरूड भरारी मारता येणार आहे. येत्या वर्षात भारतात तब्बल पाच लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी सगळ्यात जास्त नोकऱ्या या महिती तंत्रज्ञान अर्थात IT मध्ये उपलब्ध असणार आहेत. IT क्षेत्रात यंदा जवळपास तीन लाख नोकऱ्यांची दारं उघडणार आहेत.

Jan 2, 2012, 09:48 AM IST