विधानसभा २०१४

भाजपची ताकद वाढलेली नाही - रामदास कदम

महायुतीच्या जागावाटपाचा वाद टोकाला गेला असताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपची ताकद वाढलेली नसल्याचा दावा 'झी २४ तास'च्या 'रोखठोक' या खास कार्यक्रमात केलाय. 

Sep 18, 2014, 08:43 PM IST

राम कदम यांना मनसेचे दिलीप लांडे देणार टक्कर

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्यावतीने नगरसेवक दिलीप लांडे हे राम कदम यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून विभाग अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाच्या जोरावर घाटकोपर पश्चिममधली जनता आपल्यालाच निवडून देईल, असा विश्वास लांडे यांनी व्यक्त केलाय. 

Sep 18, 2014, 07:35 PM IST

मनसेचा राम भाजपमध्ये दाखल

 विधानसभा निवडणुका तोडांवर आलेल्या असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम हे भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदी वातावरण आहे.

Sep 18, 2014, 07:29 PM IST

शिवसेनेची मातोश्रीवर बैठक, युतीच्या निर्णयाकडे लक्ष

भाजपानं दिलेल्या जागावाटपाच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक होतेय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या या बैठकीला पक्षाचे तमाम नेते हजर राहणार आहेत. 

Sep 18, 2014, 06:45 PM IST

महायुतीचा चेंडू भाजपकडून शिवसेनेच्या कोर्टात

 महायुतीच्या जागावाटपाचा चेंडू भाजपनं शिवसेनेच्या कोर्टात टोलवलाय. भाजपनं दोन पावलं पुढं टाकली आहेत. शिवसेनेनंही दोन पावलं पुढं यावं असं सांगत युती तोडायची की शाबूत ठेवायची याचा फैसला भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेवर सोपवलाय. 

Sep 18, 2014, 06:22 PM IST

अमित शहांचा भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा, युतीबाबत उल्लेख टाळला

भाजपनं एका बाजुला महायुतीच्या जागावाटपाची चर्चा करण्याचा सूर लावला असला तरी दुस-या बाजुला मात्र स्वतंत्र प्रचार सुरू केलाय. भाजप अध्यक्ष अमित शाह प्रचारसभेतल्या भाषणांमध्ये काँग्रेसयुक्त भारतासोबत भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा दिला आहे. गावा-गावात जाऊन भाजप कार्यकर्त्यांचं जाळं सशक्त करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यात.  त्यांच्या कोल्हापूर आणि चौंडीतल्या भाषणांमध्ये महायुतीचं सरकार असा कुठेही उल्लेख नव्हता.

Sep 18, 2014, 06:01 PM IST

आपल्या सासरी अमित शहांनी केला पवारांवर वार

 भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह अल्पकाळासाठी कोल्हापूरात आले होते. आपल्या नातलगांची भेट घेण्यापूर्वी शहा यांनी विमानतळ परिसरातच छोटेखानी सभा घेऊन त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला...

Sep 18, 2014, 12:08 PM IST

'मोदीच आपल्यामुळे निवडून आले'

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा फड जागावाटपानंतर आणखी रंगणार आहे असं दिसतंय, कारण ज्या मतदार संघातील उमेदवारी निश्चित आहे, अशा मतदार संघात निवडणुकीच्या प्रचाराला उधाण आल्याचं दिसतंय. याचे रंग आता सोशल नेटवर्किंगवरही दिसू लागले आहेत.

Sep 18, 2014, 08:50 AM IST

राष्ट्रवादी उमेदवाराचे तिकिटासाठी देवाला साकडे

कोकणात विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेय. विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी गावोगावचे सर्वच पक्षांचे नेते अनेक खटपटी करत असतात. कोणी नेत्यांचे उंबरठे झिजवतं तर कोणी सेटिंग करतं. सिंधुदुर्गात मात्र राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांनी नेत्यांच्या फंदात न पडता थेट देवाकडेच तिकीट मागितलंय.

Sep 17, 2014, 11:25 PM IST