विधानसभा २०१४

पुढील २४ तासांत युतीविषयी निर्णय घेतला जाईल - विनोद तावडे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नवीन आणि अंतिम प्रस्तावानंतर भारतीय जनता पक्षानं दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिलीय. पुढील २४ तासांत युतीविषयी निर्णय घेतला जाईल आणि प्रत्यक्ष भेटूनच उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी म्हटलंय. 

Sep 21, 2014, 02:47 PM IST

शिवसेनेचा भाजपला अखेरचा प्रस्ताव, १५१-११९-१८चा नवा फॉर्म्युला

मुंबई- एका महिन्यात महाराष्ट्रात भगवी दिवाळी साजरी करणार, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय. भाजपला अखेरचा प्रस्ताव आणि फॉर्म्युला शिवसेनेनं दिलाय. भाजपला ११९ पूर्ण जागा लढता याव्यात म्हणून ९ ज्यादा जागा आपल्या कोट्यातून देण्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय. यानुसार आता शिवसेना १५१, भाजप ११९ आणि इतर घटक पक्ष १८ जागा अशा हा फॉर्म्युला आहे. 

Sep 21, 2014, 12:25 PM IST

विधानसभा २०१४: राज्यभरात मनसे लढविणार 200 जागा

 राज्यभरात 200 उमेदवार उभे करण्याची मनसेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तुलनेनं कमी उमेदवार उभे केले जाणार आहेत. नावांची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असं पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

Sep 21, 2014, 10:26 AM IST

चर्चेचं गुऱ्हाळ संपेना: भाजपचा नवा फॉर्म्युला शिवसेना मान्य करणार?

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना-भाजपा युतीमधील चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच आहे. शिवसेनेनं देऊ केलेला 126 जागांचा प्रस्ताव भाजपानं फेटाळला असून, १३०-१४०-१८ असा नवा फॉर्म्युल्याचा प्रस्ताव आता भाजपनं शिवसेनेला दिलाय.  

Sep 21, 2014, 08:33 AM IST

निवडणुकीचा रणसंग्राम...पण राजधानी मुंबईत चिडीचूप

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटतायत. पण राजधानी मुंबईत मात्र सध्या चिडीचूप आहे. अद्याप कोणत्याही पक्षानं उमेदवार यादी जाहीर केलेली नसल्यानं उमेदवारांना प्रचार सुरु करता आलेला नाहीय.

Sep 20, 2014, 09:21 PM IST

राष्ट्रवादीचा काँग्रेसला अल्टिमेटम, अन्यथा सर्व पर्याय खुले - पटेल

युतीतील जागा वाटपाबाबतचं घोडं अजून गंगेत न्हाहत नसताना आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम. काँग्रेसने इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेत काँग्रेसला अल्टिमेटम दिला आहे. आज रात्री काय तो निर्णय घ्या, अन्यथा आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असे राष्ट्रवादीचे नेत प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले.

Sep 20, 2014, 06:49 PM IST

उदयनराजे भोसलेंचा राष्ट्रवादीला इशारा, नेत्यांची धावपळ

सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद देण्याचं आश्वासन देऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं खासदार उदयनराजे भोसले यांचा राग शांत केला. कार्यकर्त्यांना डावलल्यास राजकीय गड नेस्तनाबूत करू असा इशारा उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीला दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा इशारा दिल्याने राष्ट्रवादीचे धावपळ उडाली.

Sep 20, 2014, 05:19 PM IST

काँग्रेसचा राष्ट्रवादीला इशारा, स्वबळाची तयारी - ठाकरे

एकीकडे महायुतीमधला पेच कायम असताना आघाडीचं घोडंही जागावाटपावर अडलंय. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं सांगितले आहे. 

Sep 20, 2014, 04:55 PM IST

निवडणुकीची अधिसूचना जारी, जागावाटपांचे गुऱ्हाळ!

महायुती आणि आघाडीचा जागावाटपांचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेनेच्या नव्या फॉर्म्युल्यावर भाजप विचार करतंय तर राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी काँग्रेसनं फेटाळून लावलीय. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही गॅसवरच आहे. निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी झालीय. मात्र महायुती आणि आघाडीत जागावाटपाचा वाद सुरू असल्यामुळं उमेदवारी यादी जाहीर करण्यास विलंब होत असून इच्छूक आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. 

Sep 20, 2014, 04:42 PM IST