विधानसभा २०१४

भाजपच्या घाटकोपर पूर्व बालेकिल्ल्यात अटीतटीची लढाई

भाजपचा बालेकिल्ला असणा-या घाटकोपर पूर्वमध्ये यावेळी अटीतटीची लढाई होतंय. सलग पाचवेळा निवडून आलेले भाजप आमदार प्रकाश मेहतांसमोर काँग्रेसच्या प्रविण छेडांनी चांगलेच आव्हान उभं केलंय. 

Sep 17, 2014, 08:17 PM IST

गोपीनाथ मुंडेंची दुसरी कन्या लोकसभेची उमेदवार

बीड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम खाडे मुंडे याच भाजपच्या उमेदवार असणार आहेत. 

Sep 17, 2014, 07:35 PM IST

ऑडिट पुण्यातील मतदारसंघांचं, १६ सप्टेंबर २०१४

ऑडिट पुण्यातील मतदारसंघांचं, १६ सप्टेंबर २०१४

Sep 17, 2014, 03:05 PM IST

रोखठोक : बायइलेक्शनचे साईड इफेक्ट

बायइलेक्शनचे साईड इफेक्ट

Sep 17, 2014, 03:04 PM IST

'दक्षिण कराड'मधूनच लढणार : मुख्यमंत्री

विधानसभा आपण दक्षिण कराडमधून लढणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. विलासकाका उंडारकर हे काँग्रेस आमदार अनेक वर्षांपासून दक्षिण कराडमधून निवडून येतात, मात्र यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना हा मतदारसंघ दिल्यास आपण बंडाचे निशाण फडकवू असा इशारा विलासकाका उंडारकर यांनी दिल्याने, मुख्यमंत्र्यांसमोर एक पेच निर्माण झाला आहे,

Sep 17, 2014, 02:45 PM IST

शरद पवारांनी संपर्क साधला – आठवलेंचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शऱद पवार यांनी संपर्क साधल्याचा गौप्यस्फोट आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी झी २४ तासच्या  रोखठोक मुलाखतीत केलाय. महायुतीनं दोन अंकी जागा दिल्या नाहीत  तर पर्याय खुला असल्याचा सूचक इशाराही त्यांनी भाजप-शिवसेनेच्या  नेत्यांना दिलाय. 

Sep 17, 2014, 02:36 PM IST

'मन मोठं करा, पण महायुती तोडू नका'

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मन मोठं करा पण महायुती तोडू नका, अशी विनंती राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

Sep 17, 2014, 02:27 PM IST

अमित शाह आज मुंबईत

भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा राज्यातला तीन दिवसांचा दौरा दोन दिवसांचा करण्यात आलाय. ते आज मुंबईत दाखल होणार आहेत. 

Sep 17, 2014, 10:31 AM IST

भाजपकडून धार्मिक तेढ, सामाजिक ऐक्याला सुरुंग - पवार

भाजप धार्मिक तेढ निर्माण करत असून सामाजिक ऐक्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

Sep 16, 2014, 09:29 PM IST

मुख्यमंत्री चव्हाण यांची कोणी केलेय कोंडी?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील काँग्रसची निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. मात्र खुदद् पृथ्वीराज बाबांना कुठल्या मतदारससंघातून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी दक्षिण कराडमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र तिथे स्वपक्षाबरोबरच, मित्रपक्ष आणि विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांची पूर्णपणे कोंडी केली आहे.

Sep 16, 2014, 08:30 PM IST

'महामुख्यमंत्री कोण?' – पृथ्वीराज चव्हाणांच्या कारभाराचा आढावा

यंदाच्या निवडणुकीत कुणाची प्रतिष्ठा सर्वाधिक पणाला लागली असेल तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची... आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेवर आणायचं आणि विरोधकांवर मात करत, पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवायचं, अशी अडथळ्यांची शर्यत त्यांना पार करायचीय... 'महामुख्यमंत्री कोण?' या आमच्या विशेष सीरिजमध्ये पृथ्वीबाबांच्या कारभाराचा आढावा...

Sep 15, 2014, 08:59 PM IST

'छत्रपती कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही'- फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज ही कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असा खणखणीत टोला भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय. झी २४ तासला दिलेल्या  खास मुलाखतीत फडणवीसांनी स्पष्ट केलंय.   

Sep 15, 2014, 07:59 PM IST