संप

मनसेचा मोर्चा नक्की होणार का?

मनसेच्या एसटी कर्मचारी संघटनेच्या उद्याच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चा काढणारच अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. मात्र दुसरीकडे मोर्चाबाबत तोडगा काढण्यासाठी पोलिसांशी बोलणी सुरू असल्याचं मनसे राज्य परिवहन वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांनी सांगितलंय.

Jan 10, 2013, 08:54 PM IST

मनसेचा संप, प्रवाशांचे हाल

एसटीनं आज प्रवास करणार असाल तर थोडं सांभाळून. कारण मनसेच्या कामगार संघटनेनं आंदोलन पुकारला आहे. त्यामुळं एसटी कामगारांच्या सामूहिक रजा आंदोलनाचा फटका राज्यातल्या वाहतुकीला बसत आहे.

Jan 10, 2013, 03:41 PM IST

नाशिकमध्ये संपांचा सुकाळ

मेडिकल दुकानांनी संप मागे घेतला असला, तरी येत्या काही दिवसांत सर्वसामान्य़ांना अनेक संप आणि बंदला सामोरं जावं लागणार अशी चिन्हं आहेत. पेट्रोलपंपधारकांबरोबरच एसटी आणि पोस्टातल्या कर्मचा-य़ांनीही संपाचा इशारा दिलाय.

Oct 15, 2012, 10:02 PM IST

`गॅस पुरवठादार संपावर गेले तर कारवाई करू`

संपावर जाल तर कारवाई करू असा सज्जड इशारा सरकारनं गॅस पुरवठादारांना दिलाय. चर्चेनं प्रश्न सुटू शकतात, गॅस पुरवठादार संपावर गेले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्न आणि नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी दिलाय.

Sep 25, 2012, 04:13 PM IST

रेल्वे मोटरमन पुन्हा जाणार संपावर

पश्चिम रेल्वेच्या मोटरमनने केलेल्या संपाला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा मोटरमन संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.

Aug 8, 2012, 10:31 PM IST

फक्त अकरा जणांसाठी, लाखोंना धरलं वेठीला...

पश्चिम रेल्वेचा अनागोंदी कारभार सुरूच आहे. प्रवाशांना वेठीस धरून मोटरमेन आपल्या मागण्या पूर्ण करू पाहत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मात्र फार हाल होत आहेत. प. रेल्वचे अधिकारी मनविंदर सिंग यांची मनमानी सुरू असल्याचे मोटरमेनचे म्हणणे आहे.

Jul 20, 2012, 06:23 PM IST

एअर इंडिया ठप्प... पायलट्सचा संप सुरुच

एअर इंडियाच्या पायलट्सचा संप आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या संपामुळे एअर इंडियाच्या मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील 20 फ्लाईट्स आज रद्द करण्यात आल्या आहेत.

May 10, 2012, 01:02 PM IST

आता संप कराल तर जेलमध्ये जाल....

संप म्हणजे अनेकांना होणारा त्रास. त्यामुळे आता हाच त्रास संपविण्याच्या दृष्टिने सरकारने अफलातून शक्कल लढविली आहे, जेणेकरून संपकरी मात्र चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Apr 20, 2012, 07:40 AM IST

नवी मुंबईत रिक्षा संपाने विद्यार्थ्यांची कोंडी

नवी मुंबईत भाडेकपातीच्या विरोधात रिक्षाचालकांनी संप पुकारल्याने रिक्षा चालकांची मुजोरी कायम असल्याचे दिसून आले. परीक्षाच्या काळात संप पुकारून विद्यार्थ्यांना वेठीस धरले. त्यामुळे पालकवर्गाची तारांबळ उडाली.

Mar 21, 2012, 09:42 AM IST

सराफा बंदने राज्यातील ग्राहकांची पंचाईत

केंद्रीय अर्थसंकल्पामधले जाचक निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी सराफा व्यावसायिकांनी आजपासून तीन दिवसीय देशव्यापी बंद पुकारल्याने मुंबई, नाशिकमध्ये सराफा बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारल्यामुळे ऐन लग्नसराईतच ग्राहकांची चांगलीच पंचाईत झालीए. सरकारनं हा जाचक निर्णय रद्द करण्यात येण्याची मागणी सराफा व्यावसायिकांकडून केली जात आहे.

Mar 17, 2012, 05:37 PM IST

बजेटविरोधात सराफांचा संप

केंद्रीय अर्थसंकल्पामधले जाचक निर्णय रद्द करावे या मागणीसाठी सराफ व्यावसायिकांनी आजपासून तीन दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे.

Mar 17, 2012, 10:12 AM IST

मीरा रोड भागात रिक्षाचालकांचा संप

मुंबईच्या मीरा रोड भागात मुजोर रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. आरटीओनं ठरवलेल्या नवीन दरपत्रकाविरोधात रिक्षाचालकांनी बंदची हाक दिली.

Feb 29, 2012, 02:18 PM IST

संपाने केले १० हजार कोटींचे नुकसान

अनेक प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद लाभला. या संपामुळे १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. तर संपादरम्यान, मुंबईतील सर्व राष्ट्रीय बँका जवळपास बंद होत्या. तर काही ठिकाणी दुपारपासून एटीएम मधील पैसे संपले होते. संपामुळे चेक क्लिअरिंगची यंत्रणा बंद असल्याने १0 कोटीहून अधिकचे व्यवहार ठप्प झाले होते.

Feb 29, 2012, 09:15 AM IST

देशव्यापी संप, पण मुंबई थांबली नाहीच

बेरोजगारी आणि खासगीकरणाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला सुरुवात झाली आहे. या संपात केंद्र सरकारच्या विविध उपक्रमातील संस्थांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Feb 28, 2012, 10:35 AM IST

देशव्यापी संपामुळे शाळाही बंद !

देशव्यापी संपाचा पुण्यातील शाळांवर विपरीत परिणाम झाला आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेतच पाठवलं नसल्यानं बहुतांश शाळा बंद आहेत.

Feb 28, 2012, 10:14 AM IST