सानिया मिर्झा

पाकिस्तानात व्हायरल होतेय सानिया-शोएबची जाहिरात

सध्या भारताची स्टार टेनिसप्लेयर सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांची एक जाहिरत व्हायरल होतेय. हे दोघेही पहिल्यांदाच एका जाहिरातीत एकत्र दिसलेत. नेस्ले एव्हरी डेचीही जाहिरात सोशल मीडियावर गाजतेय. 

Mar 15, 2016, 12:03 PM IST

सानिया-मार्टिनाला ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडची सहकारी मार्टिना हिंगीस यांनी दिमाखदार कामगिरीचा नजराणा पेश करताना यंदाच्या वर्षातील महिला दुहेरीत पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकलेय.

Jan 29, 2016, 01:30 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपन : पेस - सानियाची जोडी एकमेकांना भिडणार

सानिया मिर्झा आणि लिएंडर पेस यांनी आपल्या जोडीदारांसोबत विजय मिळवून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत मिश्रित युगल सेमीफायनलमध्ये जागा मिळवलीय. त्यामुळे, मिक्स डबलमध्ये लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा हे दोन भारतीय खेळाडू आपापल्या जोडीदारासोबत एकमेकांनाच भिडणार आहेत. 

Jan 27, 2016, 10:53 AM IST

सानिया मिर्झाचा 'दुहेरी' विजय

ऑस्ट्रेलियन ओपन सामन्यात भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झासाठी आजचा दिवस विजयाचा ठरला. सानियाने महिला दुहेरी स्पर्धेत विजय मिळवला. 

Jan 23, 2016, 06:25 PM IST

सानिया-मार्टिनाचा सलग ३०वा विजय, सिडनी टेनिस स्पर्धेचे जेतेपद

सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत टेनिस दुहेरीतील अव्वल मानांकित जोडी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या वर्षातील दुसऱ्या आणि एकूण ११व्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तसेच या जोडीने सलग ३० सामन्यात अपराजित राहण्याचा नवा विश्वविक्रम नोंदवला. 

Jan 16, 2016, 08:49 AM IST

सानिया-मार्टिनाने सलग २९ सामने जिंकत रचला नवा विक्रम

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची स्विस जोडीदार मार्टिना हिंगीस यांचा गेल्या वर्षीपासून सुरु असलेला विजयी झंझावात नव्या वर्षातही कायम आहे. सलग २९ सामने जिंकत या जोडीने टेनिस विश्वात महिला दुहेरीत नवा विक्रम रचलाय. 

Jan 14, 2016, 02:20 PM IST

सानिया मिर्झाची अजब मागणी, मागितले चार्टर्ड विमान

 जगातील क्रमांक एकची महिला डबल्स टेनिस स्टार सानिया मिर्झाने अशी मागणी केली त्यामुळे मध्यप्रदेशच्या क्रीडा विभागाने तिला पुरस्कार सोहळ्यालाच न बोलविण्याचा निर्णय घेतला. 

Dec 2, 2015, 06:14 PM IST

ममता बॅनर्जींच्या हाती टेनिसची रॅकेट

ममता बॅनर्जींच्या हाती टेनिसची रॅकेट

Nov 27, 2015, 10:42 AM IST

'माझ्या बेडरुममध्ये काय चाललंय हे विचारण्याचा अधिकार कुणालाही नाही'

आपण पुरुषप्रधान वातावरणात वावरतोय, असं भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिला प्रकर्षानं जाणवतंय... तिनं ते उघडपणे बोलूनही दाखवलंय. शिवाय, आपण केवळ 'पब्लिक फिगर' आहोत म्हणून कुणीही येऊन काहीही विचारण्याचा किंवा म्हणण्याचा हक्क मी कुणालाही दिलेला नाही, असंही तिनं ठणकावून सांगितलंय. 

Nov 27, 2015, 10:05 AM IST

सानियाने ममता बॅनर्जींना दिले टेनिसचे धडे

 भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना टेनिसचे धडे दिले. एका प्रदर्शनीय सामन्यात कोलकात्यात ही दृष्य पहायला मिळाली.

Nov 27, 2015, 08:52 AM IST

सानिया मिर्झा - मार्टिना हिंगिस जोडीने डब्ल्यूटीएचा किताब जिंकला

डब्ल्यूटीएच्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झा - मार्टिना हिंगिस जोडीने आपली विजयी घौडदौड सुरुच ठेवली आहे. यावर्षात चांगली कामगिरी करत या जोडीने यंदाच्या वर्षातील नववे विजेतेपद पटकावले. या जोडीने स्पेनच्या जोडीचा पराभव केला.

Nov 1, 2015, 05:02 PM IST

सानिया-मार्टिनाची घौडदौड कायम, चानया ओपन जिंकली

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने पुन्हा एकदा कमाल करुन दाखवली आहे. महिला दुहेरीत चायना ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकाविले.

Oct 10, 2015, 10:27 PM IST

सानिया - मार्टिनाने वुहान ओपन महिला किताब जिंकला

जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या दुकलीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. वुहान ओपन वुमेन डबल्स ट्रॉफी जिंकत आपली विजयी घौडदौड कायम राखली. टॉप सीडेड असलेल्या सानिया-मार्टिना जोडीने ही सातवी स्पर्धा जिंकली आहे.

Oct 3, 2015, 05:00 PM IST