साप

सापांची मिरवणूक - नागांच्या स्पर्धेसाठी हवीय परवानगी!

सांगली जिल्ह्यातलं बत्तीस शिराळा गाव... इथल्या नागपंचमीच्या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.

Jul 3, 2015, 07:44 PM IST

व्हिडीओ | ३ कोटी लोकांनी पाहिलेला, ससा X सापाचा हा संघर्ष

ससा आणि कासवाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल, त्यात ससा हरला होता, पण ससा आणि सापाचं हे भांडण तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल, ससा कसा जिंकलाय.

Jun 24, 2015, 12:46 PM IST

कसारा लोकलमधील महिला डब्यात साप, ऐन गर्दीत गोंधळ

संध्याकाळी घरी निघण्याच्या वेळी दिवा स्थानकादरम्यान कसारा लोकलमधील महिला डब्यात साप असल्याच्या चाहूलेने गोंधळ उडला. साखळी ओढून लोकल थांबविण्यात आली.

Mar 12, 2015, 08:55 PM IST

जेव्हा साप त्याच्या मृत्यूचा बदला घेतो

राजस्थानच्या सिरोही जिल्हामध्ये आम्बेश्वर्जी या गावामध्ये एनसीसी शिबीरात रविवारी रात्री पुन्हा एकदा साप चावण्याची घटना घडली. या शिबीरामध्ये अचानक चार कॅडेट्स आजारी पडल्यामुळं   चारही जणांना हॅास्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. यातील दोघांना पाली इथं उपचारासाठी पाठवण्यात आलंय.

Aug 25, 2014, 03:38 PM IST

अवैध ताबा हटविणाऱ्या अधिकाऱ्यांवर सोडले साप

राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील गुर्जर सीमाला येथे अवैध ताबात हटविण्यासाठी पोहचलेल्या  अधिकाऱ्यांवर संतप्त गावकऱ्यांनी साप सोडल्याची अजब घटना घडली. यात तहसीलदारांसह अनेक पोलिस कर्मचारी आणि महसूल विभागाचे अधिकारीही सामील होते. सापांना पाहून अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. ज्या गावात अवैध ताबा हटवायचा होता तेथे अनेक गारुडी राहत होते. 

Aug 1, 2014, 04:38 PM IST

अजगराने क्षणात मगरीला फस्त केलं

तुम्ही कधी सापाला मगर खातांना पाहिलं आहे का?, कारण एका अजगराने थेट एका मगरावरचं ताव मारला.

Mar 4, 2014, 02:59 PM IST

जहरी सापांच्या विषाची दिवसाढवळ्या विक्री

सापाचं विष किती धोकादायक असतं, हे वेगळं सांगायला नको... या विषाचा एक थेंब आणि जीवनाचा खेळ खल्लास... परंतु पाटण्यामध्ये या जहरी सापांचं विष अगदी दिवसाढवळ्या विकलंय जातंय... नशेसाठी या विषाचा सर्रास वापर होतोय... पण पोलिसांना त्याची साधी खबरही नाही... झी मिडियानं छुप्या कॅमेरातून केलेलं हे स्टिंग ऑपरेशन...

Feb 21, 2014, 10:39 PM IST

अबब! राहत्या घरात हे किती अजगर आणि साप!

अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथं एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका शिक्षकाच्या घरात एक-दोन नव्हे तर शेकडो अजगर आणि साप आढळले आहेत. या शिक्षकाला अटक करण्यात आलीय.

Jan 30, 2014, 05:08 PM IST

करून घेऊया सापांशी ओळख

अन्न साखळीचा प्रमुख घटक असलेल्या आणि लुप्त होण्याच्या मार्गावरील सापांची ओळख सांगणारा हा आमचा विशेष वृत्तांत...

Aug 11, 2013, 02:36 PM IST

एका वेळी सापाची २२ पिल्लं

अत्यंत दुर्मिळ अशा फुरसे जातीच्या सापाने धुळ्यातल्या सर्पविहार संस्थेत 22 पिल्लांना जन्म दिलाय. ही मादी आणि तिची पिलं स्वस्थ असून पिलांची लांबी 40 ते 50 सेंमी एवढी आहे.

May 13, 2012, 10:53 PM IST

उन्हाचा ताप, म्हणून मनुष्यवस्तीत साप

वाढत्या तापमानामुळे माणसाबरोबर प्राणीही अस्वस्थ होऊ लागले आहेत. गोव्यात एका आठवड्यात दोन किंग कोब्रा जातीचे नाग मनुष्यवस्तीजवळ आढळले आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तब्बल १३ फूट लांबीचे हे नाग होते.

Apr 14, 2012, 04:42 PM IST