डॉक्टरांच्या संपाची भूमिका ताठर, सू-मोटो याचिका
मार्डच्या संपानंतर सोलापूरच्या ३ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मार्डची मागणी केली आहे. सू-मोटो याचिका दाखल करत हायकोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
Jan 3, 2014, 11:20 AM ISTपोलिसांचं निलंबन, तरीही मार्डची संपाची भूमिका कायम
सोलापूरमध्ये निवासी डॉक्टराला पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड बेमुदत संपावर गेलीय. डॉक्टर मारहाण प्रकरणी तीन पोलिसांचं निलंबन केलं असलं तरी मार्डने संपाची भूमिका कायम ठेवलीय.
Jan 3, 2014, 11:16 AM ISTडॉक्टरांना मारहाण प्रकरणी तीन पोलीस निलंबित
सोलापूरमधील निवासी डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह तीन जणांना निलंबित करण्यात आलंय.
Jan 2, 2014, 02:31 PM ISTगरोदर महिलेला पोलिसांनी केली मदत; डॉक्टरांचं कामबंद!
एका गरोदर महिलेला लवकर उपचार मिळावे, यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याविरोधात सोलापूरमधल्या शासकीय रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे १५०० रुग्णाचे आरोग्य धोक्यात आलंय.
Dec 31, 2013, 10:55 AM ISTगृहमंत्र्यांच्या गावात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना अटक
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मतदारसंघातून दहशतवाद्यांना मदत करणा-या दोघांना अटक करण्यात आलीय.. एटीएस, महाराष्ट्र एटीएस आणि सोलापूर क्राईम ब्रांचनं ही कारवाई केलीय.. या आरोपींकडून स्फोटंकं आणि पिस्तुल जप्त करण्यात आलीत.
Dec 25, 2013, 12:54 PM ISTविधवेवर सामूहिक बलात्कार, प्रियकरावरही गुन्हा दाखल
विधवा महिलेच्या असाह्यतेचा फायदा घेवून तिच्यावर सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना सोलापुरात घडलीय.
Nov 23, 2013, 08:53 PM ISTकार्तिकी एकादशी : पंढरपुरात उत्साह, विरोधानंतर अजित पवारांचा दौरा रद्द
कार्तिकी एकादशी. "अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा भेटीन माहेरा आपुलिया` अशी आस उराशी बाळगून कार्तिकी यात्रेच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे तीन लाख वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. दरम्यान, वारकऱ्यांचा विरोधानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही कारणाने आपला दौरा रद्द केला.
Nov 13, 2013, 07:34 AM ISTजामा मशिदीची रेकीचा संशय, चौकशी पथक आंध्र प्रदेशात
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात जामा मशिदीची रेकी झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. परभणी पोलीस आणि राज्य एटीएस पथकानंही याची दखल घेतली असून सोलापूर आणि आंध्र प्रदेशमध्येही चौकशीचं एक पथक रवाना झालंय. काय आहे. काय आहे हा सारा प्रकार. एक रिपोर्ट.
Oct 19, 2013, 11:35 AM ISTतुळजाभवानी देवी मंदिरात चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू तर १९ जखमी
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सणाला गालबोट लागलं आहे. तुळजापूरातील तुळजाभवानी देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविका जागीच मृत्यू तर १९ भावीक जखमी झाले आहेत. जखमींपैकी १० भाविकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सोलापूरच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
Oct 5, 2013, 07:10 AM ISTसोलापूर महापालिकेची होर्डिंग्ज हटाव मोहीम!
सोलापूर महानगरपालिकेनं ५०० पोलिसांच्या मदतीनं शहरातल्या अवैध डिजिटल होर्डिंग्ज काढण्यास सुरुवात केलीय. ही मोहीम आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली.
Oct 1, 2013, 12:12 PM ISTउजनी धरण १०० टक्के भरलं
सोलापूरसह पाच जिल्ह्यांना वरदायी ठरलेलं उज्जनी धरण १०० टक्के भरलंय. गेल्या सहा वर्षात हे धरण पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यातच भरलंय.
Aug 17, 2013, 10:38 PM ISTजैन साधकांना मारहाण, बस दिली पेटवून
सोलापूरमध्ये किरकोळ कारणावरुन जैन साधकांना जबर मारहाण झालीये. त्यांची बसही पेटवून देण्यात आली. सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावरील कोयना नगर येथे ही घटना घडलीये.
Aug 10, 2013, 01:58 PM ISTलोहयुक्त गोळ्यांमधून विद्यार्थ्यांना विषबाधा
बिहारमध्ये मध्यान्ह भोजनातून विषबाधा प्रकरण ताजं असतानाच सोलापुरात ५२ शाळकरी मुलांना उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झालाय. माळकवठेमधल्या पंचाक्षरी विद्यालयातली ही घटना आहे.
Jul 19, 2013, 10:28 AM ISTसोलापुरात तीन काळविटांची शिकार
सोलापूर जिल्ह्यात ३ काळविटांची शिकार करण्यात आली आहे. कामती इथली ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली.
Jul 9, 2013, 05:41 PM ISTखोटे सोने तारण ठेऊन बँकेलाच गंडवले!
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंढरपूर आणि टेंभूर्णी शाखेला बनावट सोनं तारण ठेवून गंडवल्याचं समोर आल्यानं जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडालीय. बँकेच्या सराफानंच बँकेला गंडवलंय.
Jun 26, 2013, 07:45 PM IST