हरियाणा

एक इंजिनिअर बनलाय ‘जगतगुरू बाबा रामपाल’

हिरयाणातील वादग्रस्त रामपाल बाबा यांचे समर्थक आणि पोलिस यांच्या सुरु असलेल्या धुमचक्रीत 6 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झालेत. हिस्सारमध्ये अशी परिस्थिती नक्की का निर्माण झाली आणि हे रामपाल बाबा नक्की आहेत तरी कोण हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील... त्याचीच ही उत्तरं... 

Nov 19, 2014, 06:43 PM IST

अखेर बाबा रामपालला अटक... हिस्सार पोलिसांची कारवाई

 अखेर पोलिसांनी रामपालला अटक केलीय. बाबा रामपाल याला बरवाला इथल्या सतपाल आश्रमातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

Nov 19, 2014, 02:00 PM IST

वादग्रस्त संत रामपालवर ‘राजद्रोहा’चा गुन्हा दाखल

रामपाल समर्थकांकडून होणारा सशस्त्र विरोध बघून पोलिसांना वादग्रस्त बाबा आणि सतलोक आश्रमातील अधिकाऱ्यांसह अनेक अनुयायांविरोधात राजद्रोह आणि इतर आरोपांअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. 

Nov 19, 2014, 01:39 PM IST

सोनियांचे जावई संतापले, रिपोर्टरचा माईक ढकलला!

जमिनीच्या व्यवहारांबाबत विचारल्या सोनिया गांधींचे जावई आणि बिझनेसमन रॉबर्ट वड्रा संतापले. संतापाच्या भरात त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टरचा माईक ढकलला. तसंचवड्रांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकाराला फुटेज डिलीट करण्याची धमकी दिली. या घटनेवरून वड्रांसह काँग्रेसवरही सडकून टीका होतेय. तर काँग्रेसनं वड्रांची पाठराखण केली आहे.

Nov 2, 2014, 02:04 PM IST

अबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा

अबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा

Oct 29, 2014, 10:19 AM IST

अबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा

 सोनिपत जिल्ह्यातील गोहाना इथं दरोडेखोरांनी 125 फूट लांब भुयार खोदून थेट पंजाब नॅशनल बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये प्रवेश मिळवत कोटय़वधीच्या रोख रकमेवर डल्ला मारला. ‘धूम-1’ स्टाईलच्या या दरोडय़ानं पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे. लुटीची नेमकी रक्कम उघड झाल्यानंतर देशातील हा सर्वात मोठा दरोडा ठरण्याची शक्यता आहे.

Oct 28, 2014, 06:53 PM IST

मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ

 हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे मनोहर लाल खट्टर एका भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते. याशिवाय भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही या शपथविधीला हजेरी लावली.

Oct 26, 2014, 02:51 PM IST

अजब-गजब : एका पानवाल्याचं वीज बिल 132.29 करोड रुपये!

दिवाळीच्या दिवसांत हरियाणाच्या एका पान विक्रेत्याला चांगलाच झटका बसलाय. राज्य सरकारच्या वीज विभागाकडून त्यांना तब्बल 132.29 करोड रुपयांचं बिल धाडलं गेलंय. 

Oct 24, 2014, 09:29 PM IST

खट्टर यांच्याशी संबंधित आठ महत्वाचे मुद्दे

मनोहर लाल खट्टर हे हरियाणात भाजपाचे पहिले मुख्यमंत्री असतील, खट्टर हे पंजाबी आहेत. पंजाबी समाजातील ते हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री आहेत.

Oct 21, 2014, 02:54 PM IST

एक्झिट पोलमध्ये हरियाणात भाजप अव्वल!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जवळपास ६२ टक्के मतदान झालं असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय. तर हरियाणामध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७३ टक्के मतदान झालंय. झी मीडिया आणि तालिमच्या एक्झिटपोलनुसार दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष पहिल्या नंबरवर असेल.

Oct 15, 2014, 08:08 PM IST

महाराष्ट्र, हरियाणा राज्याच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीची आज घोषणा झाली. महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरला निवडणूक तर हरियाणात २७ ऑक्टोबरला होणार आहे.

Sep 12, 2014, 04:46 PM IST