तक्रार केल्याबद्दल विद्यार्थिनींना धक्कादायक शिक्षा
बीडच्या आदित्य दंत महाविद्यालयात एक संतापजनक प्रकार घडलाय. महाविद्यालयातल्या गैरप्रकारांची तक्रार केल्याबद्दल इथल्या सहा विद्यार्थिनींना चक्क हॉस्टेलबाहेर काढून कर्मचा-यांच्या घरी राहण्यास भाग पाडण्यात आलंय..
Jan 13, 2013, 03:01 PM IST‘साहेब स्वप्न पूर्ण होणार, मॅचमध्ये ब्लास्ट होणार’
‘साहेब तुमचे स्वप्न पूर्ण होणार, टी-२० सामन्यामध्ये बॉम्बब्लास्ट होणार’ असा मॅसेज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या खासगी सचिवांना - मिलिंद नार्वेकरांना - धाडणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बीडमधून अटक केलीय.
Dec 27, 2012, 02:08 PM ISTसुप्रीम कोर्टाचा दणका, सुदाम मुंडे जेलमधेच
स्त्री भ्रूण हत्यांप्रकरणी अटकेत असलेल्या बीडचा डॉक्टर डेथ सुदाम मुंडेला सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिलाय. त्यामुळे मुंडेला सहामहिने जेलची हवाच खावी लागणार आहे.
Nov 14, 2012, 10:47 AM ISTडॉ. सरस्वती मुंडेला जामीन मंजूर
बीडमधल्या विजयमाला पट्टेकर मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. सरस्वती मुंडेंला सशर्त जामीन मंजूर झालाय. तीन लाखांच्या जातमचुलक्यावर अंबाजागोई सत्र न्यायालयानं सरस्वती मुंडेंला जामीन मंजूर केलाय.
Sep 25, 2012, 01:44 PM IST'मोक्का'चा निषेध : बीडमध्ये डॉक्टर संपावर
बीडमधील डॉक्टर संपावर गेलेत. स्त्री-भ्रूण हत्येप्रकरणी दोषी डॉक्टरांवर मोक्का लावण्याच्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मागणीचा निषेध म्हणून डॉक्टरांनी संप पुकारलाय. या संपामुळे रूग्णांचे मात्र हाल सुरू आहेत.
Jul 29, 2012, 02:29 PM IST२६/११चं मॉकड्रील पाकिस्तानमध्येच – अबू जिंदाल
२६/११ च्या दोन दिवस अगोदर अबू जिंदालनं फैयाज कागझीसोबत पाकिस्तानात हल्ल्याचं मॉकड्रील केल्याची माहिती आता समोर येतेय. पाकिस्तानच्या बैतुल्ला मुजाहिद्दीन भागात दहशतवाद्यांनी तब्बल दोन तास ही मॉकड्रील घेतली होती. यासाठी सर्व सोयीयुक्त असा कंट्रोल रुमही बनवण्यात आला होता.
Jun 30, 2012, 07:42 AM IST‘अबू अन्सारी माझा मुलगा नाहीच’
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातला दहशतवादी अबू अन्सारी हा आपला मुलगा नाहीच, असा दावा जबीउद्दीन अन्सारीच्या आई रेहाना बेगम यांनी केलाय.
Jun 28, 2012, 01:39 PM IST२६/११ हल्ला : हमजा बीडचा रहिवासी
मुंबईतल्या 26/11च्या हल्ल्यातला आरोपी अबू हमजाच्या चौकशीसाठी मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसची टीम दिल्लीला जाणार आहे. अबू हमजा हा गेल्या काही वर्षापासून फरार होता. दरम्यान, अबू हमजा हा बीड जिल्ह्यातला रहिवासी आहे.
Jun 26, 2012, 09:48 AM ISTराज्यात शेतीची नशा
सुरेंद्र गांगण
बीड, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अफूची शेती फोफावत आहे. बीड जिल्ह्यात प्रथम अफूच्या शेतीची पाळेमुळे दिसून आली. मात्र, ही पाळेमुळे खोलवर रूजलेली होती. कृषी अधिकाऱ्यांना चक्क चुना लावून अन्य शेतीच्या नावाखाली अफूची पेरणी केली गेली. ही पेरणी बक्कळ पैसा मिळविण्यासाठीच झाल्याचे स्पष्ट होत आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी या शेतीची नशाच शेतकऱ्याला पडलेली दिसून येत आहे.
बीडमध्ये गर्भपिशवी काढण्याचा धंदा
डॉक्टर सुदाम मुंडे, डॉक्टर शिवाजी सानप यांच्यावरील कारवाईनंतर बीडमधल्या स्त्रीभ्रूणहत्यांचा मुद्दा पुन्हा गाजतोय. पोलिसांनी सुरु केलेल्या तपासांत अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्यात आहेत. परळी, बीडमध्ये केवळ गर्भपात, स्त्री भ्रूणहत्याच होत नाहीत, तर गर्भपिशवी काढून टाकण्याचा धंदाही इथं जोरात असल्याचं तपासात पुढे आले आहे
Jun 4, 2012, 07:48 PM ISTप्रिया सानप यांच्या विरोधातही गुन्हा
बीडमध्ये स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी काल अटक झालेल्या डॉक्टर शिवाजी सानप यांच्या पत्नी प्रिया सानप यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jun 4, 2012, 07:15 PM ISTफरार डॉ. मुंडेकडे कोट्यवधींची माया
स्त्री भ्रूण हत्येतील प्रमुख आरोपी डॉ. सुदाम मुंडे याच्याकडे कोट्यवधी रूपयांची माया सापडली आहे. तो १५० कोटी संपतीची धनी असल्याचे उघड झाले आहे. मुंडे हा अनेक दिवसांपासून फरार असल्याने त्याची माहिती देणाऱ्यासाठी ४० हजारांचे बक्षिसही जाहीर केले आहे.
Jun 4, 2012, 06:56 PM ISTबीडमध्ये मेडिकल दुकानावर छापे
बीडमध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनानं जिल्ह्यातल्या मेडिकल दुकानावर छापे टाकायला सुरु केलीये. १२ औषध निरीक्षक आणि दोन सहआयुक्त मागील दोन दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत.
Jun 4, 2012, 05:34 PM ISTखासगी सोनोग्राफी सेंटर्स होणार बंद
बीड जिल्ह्यातील स्त्री भ्रूणहत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने आता कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केलीय. यानुसार बीड जिल्ह्यातील खासगी सोनोग्राफी सेंटर्स बंद करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे.
Jun 4, 2012, 05:34 PM IST... तो गर्भ मुलीचाच!
बीडमधील संशयित गर्भपात प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झालाय. या रिपोर्टमुळे सदर गर्भ मुलीचाच असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे ‘स्त्री भ्रृण हत्येच्या’ संशयाला आता पुराव्याचं बळ मिळालंय.
May 21, 2012, 10:22 AM IST