celebration

सुमित्रा महाजन यांचा लोकसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव

मुळच्या कोकणातल्या चिपळूणच्या असलेल्या इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महाजन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवलाय.

Jun 5, 2014, 11:35 PM IST

लोकसभा अध्यक्षपदी सुमित्रा महाजन, कोकणात आनंदोत्सव

लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ खासदार सुमित्रा महाजन यांचं नाव निश्चित झालंय. त्यांच्या निवडीनं कोकणातील रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. कारण एका चिपळूणकर कन्येला लोकसभा अध्यक्षपदी बसण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त होणार आहे. चिपळुणात लहानाची मोठी झालेली ही मराठी मुलगी लोकशाहीतील या मानही चिपळूणची सर्वोच्च मुलगी मोठ्या स्थानावर विराजमान होत आहे.

Jun 5, 2014, 07:50 PM IST

रांगड्या सातारकरांचा ‘गुलमोहर डे’...

गुलमोहोराच्या झाडाला प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्थान असतं. वैशाख वणव्यातल्या नाजूक स्नेहबंधनाला धुमारे फुटणारा भारदार वृक्ष म्हणजेच गुलमोहोर... या गुलमोहोराचं महत्त्व पटवून देण्यासाठी सातारकर गेली १५ वर्ष गुलमोहोर डे साजरा करतात.

May 1, 2014, 11:10 PM IST

राज्यभरात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत!

हिंदू दिनदर्शिकाप्रमाणे चैत्र शुध्द प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. चैत्र महिना हा मराठी महिन्यातील पहिला महिना. या महिन्यातील पहिला दिवस म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच नव वर्षाचा पहिला दिवस.

Mar 31, 2014, 11:02 AM IST

तनिषानं अरमान कोहलीला दिलं खास गिफ्ट!

बिग बॉसमधील चर्चित तनिषा मुखर्जीने घरातून नापंसती असतानाही, अरमान कोहलीचा वाढदिवस खास पद्धतीनं साजरा केलाचं समजतंय. त्यासाठी तिनं त्याच्यासोबत काही सुट्ट्या एकत्र घालवल्यात.

Mar 25, 2014, 12:01 PM IST

पहाटे पाच वाजेपर्यंत `थर्टी फर्स्ट`चा धूम-धडाका!

आता, मुंबईकरही ‘थर्टी फर्स्ट’चं सेलिब्रेशन पहाटे पाच वाजेपर्यंत करण्यास मोकळे झाले आहेत. ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनसाठी मुंबई हायकोर्टानं पार्ट्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी दिलीय.

Dec 31, 2013, 01:23 PM IST

`थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन`साठी बार मालकांची कोर्टात धाव

‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनसाठी राज्य सरकानं पहाटे पाच वाजेपर्यंत बार आणि हॉटेल्स सुरू ठेवायला परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी ही डेडलाइन रात्री दीड वाजेपर्यंत खाली आणल्यानं हॉटेल व्यावसायिकांची पंचाईत झालीय.

Dec 31, 2013, 10:31 AM IST

नववर्षाचं स्वागत कसे करतायत बॉलिवूड स्टार्स, पाहा...

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची यंदाच्या वर्षाची सुरुवात अनेक रमणीय स्थळांवर होणार आहे... तर काही जण नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांमधून करणार आहेत.

Dec 31, 2013, 10:07 AM IST

अरविंद केजरीवालांचं, गरज सरो... वैद्य मरो!

जनलोकपालसाठी अण्णा हजारे यांनी `करो या मरो`चा निर्धार करत, बेमुदत उपोषण सुरू केलंय... तर दुसरीकडं आम आदमी पार्टीचा आणि पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांचा अजूनही विजयाचा जल्लोष सुरू आहे.

Dec 11, 2013, 06:07 PM IST

साईंची शिर्डी उजळली दिव्यांनी!

दिपावली हा लक्षलक्ष दिव्यांनी आसमंत आणि धरती उजळून काढणारा उत्सव. शिर्डीतही दिपावलीचा उत्सव मोठया उत्साहानं साईभक्त साजरा करतात. वर्षातील सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी भक्त शिर्डीत येतात.

Nov 3, 2013, 09:44 AM IST

कोर्टानं काढली लालू समर्थकांच्या फटाक्यांची वात!

सीबीआयचं विशेष कोर्ट लालू प्रसाद यादव यांना दिलासा देईल अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. मात्र आता ती मावळलीय. कारण कोर्टानं त्यांना दोषी ठरवलंय. त्यामुळं सेलिब्रेशनसाठी आणलेले फटाके तसेच राहिलेत.

Sep 30, 2013, 01:44 PM IST

गानसम्राज्ञी लतादीदींचा आज ८४वा वाढदिवस!

जादूई आवाजातील स्वर्गीय सुखाचा आनंद म्हणजे काय. याचं उत्तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यापेक्षा दुसरं काय असू शकतं. आपल्या लाडक्या लतादीदींचा आज ८४वा वाढदिवस. त्यानिमित्त या गानकोकिळेला हा सलाम...

Sep 29, 2013, 02:09 PM IST

‘दहीहंडी’ हा खेळ नाही उत्सवच!

दहीहंडीचा खेळात समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र खेळाचा दर्जा मिळण्याची हंडी फोडण्याचे प्रयत्न लावण्याआधीच अपेक्षांचा मनोरा कोसळलाय. गेल्या आठवड्यातल्या मंत्रिगटाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही चर्चाच संपवून टाकली.

Sep 24, 2013, 11:08 AM IST

करिना झाली ३३ वर्षांची, सैफनं दिली लंडनमध्ये पार्टी

अभिनेता सैफ अली खानसोबत गेल्यावर्षी विवाहबंधनात अडकलेली बॉलिवूडची ‘बेबो’ करिना कपूर आज ३३ वर्षांची झालीय. करिना आपला वाढदिवस लंडनमध्ये साजरा करतेय.

Sep 22, 2013, 10:01 AM IST