congress

नागपुरात काँग्रेस- राष्ट्रवादीचा एकाच मतदारसंघावर दावा

नागपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी एकाच मतदारसंघावर दावा केला आहे. गेल्या काही वर्षात या मतदारसंघात आपली ताकत वाढल्यानं आता तो मतदारसंघ आपल्या वाट्याला देण्याची मागणी राष्ट्रवादीनं केलीये. तर ताकद वाढल्याचे पुरावे देण्याचं आव्हान काँग्रेसनं दिलंय.

Sep 1, 2014, 08:39 PM IST

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आघाडीतलं 'दुखणं'

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतील काही बाबी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. पीटीआयशी बोलतांना न डगमगता मुख्यमंत्र्यांनी काही मतं मांडली आहेत.

Aug 31, 2014, 11:26 AM IST

विनोद तावडेंचा काँग्रेसवर पलटवार

विनोद तावडेंचा काँग्रेसवर पलटवार

Aug 30, 2014, 08:04 PM IST

काँग्रेस आघाडीबाबत राष्ट्रवादीची सारवासारव

 स्वबळाची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडीबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतली. २८८ जागांच्या मुलाखती म्हणजे स्वबळावर निवडणूक लढवणार असा अर्थ होत नाही, अशी सारवासारव राष्ट्रवादीनं केलीये. पुढल्या आठवड्यात दिल्लीत आघाडीबाबत अंतिम निर्णय होईल, असंही पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.

Aug 28, 2014, 07:40 AM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपावरुन तणाव वाढला

 काँग्रेस-राष्ट्रवादीत विधानसभेच्या जागावाटपावरुन तणाव  निर्माण झालाय. राष्ट्रवादीला 120पेक्षा जास्त जागा देण्याची काँग्रेसची तयारी नाही. मुंबईत सुरु असलेल्या काँग्रेस समन्वय समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडू नये, अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे.

Aug 27, 2014, 08:38 AM IST

मोदी लाट ओसरली - काँग्रेस

 बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब या चार राज्यांमध्ये विधानसभेच्या 18 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतील दहा जागा काँग्रेस व मित्रपक्षांनी जिंकल्या आहेत. या निकालांवर भाष्य करताना काँग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी भाजपच्या मोदी लाटेची खिल्ली उडवली. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने संपूर्ण देश मोदीमय झाल्याचा आणि मोदींच्याच नावावर मते मिळतील, असा प्रचार चालवला होता; परंतु ही लाट ओसरत चालली आहे. 

Aug 26, 2014, 08:26 AM IST

मी मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही - मुख्यमंत्री

 सोलापुरातल्या हुल्लडबाजीसारखा प्रकार पुन्हा होणार नाही, असं आश्वासन जोपर्यंत नरेंद्र मोदी देत नाहीत, तोपर्यंत मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय.

Aug 23, 2014, 07:11 PM IST

राष्ट्रवादीसमोर सर्व पर्याय खुले, तर स्वबळावर - पटेल

 काँग्रेसकडून जागा वाटपाबाबत लवकर आणि अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीसमोर सर्व पर्याय खुले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Aug 23, 2014, 06:52 PM IST

खतगावकरांनी केला काँग्रेसला राम-राम

खतगावकरांनी केला काँग्रेसला राम-राम

Aug 23, 2014, 09:45 AM IST