congress

आघाडी कायम, सोनिया-पवारांचा निर्णय

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी कायम राहणार आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांची नवी दिल्लीत बैठक पार पडलीय त्यात आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पवार आणि सोनियांमध्ये जागावाटपावरही चर्चा झालीय. 

Aug 6, 2014, 05:52 PM IST

ना आता बंडाचा 'नारा', न रामा'यण'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं बंड अखेर थंड झालं आहे. कारण यापुढेही आपण काँग्रेसमध्ये काम करू असं नारायण राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

Aug 5, 2014, 06:15 PM IST

10 वर्ष राष्ट्रवादीनं सत्ता भोगली तेव्हा दोष सापडले नाहीत- मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबत इतकी वर्षे सत्ता भोगली तेव्हा त्यांना दोष सापडले नाहीत. मात्र, लोकसभेचे निकाल धक्कादायक लागताच आता प्रत्येकाला शहाणपण सुचू लागलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी. पी. त्रिपाठी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 

Aug 3, 2014, 04:13 PM IST

काँग्रेसला आघाडी चालवण्याची अक्कल नाही - डी. पी. त्रिपाठी

राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी. पी. त्रिपाठी यांनी काँग्रेसवर जहरी टीका केलीय. काँग्रेसला आघाडी चालवण्याची अक्कल नाही. 

Aug 1, 2014, 07:55 PM IST

राणे मंगळवारी अंतिम भूमिका करणार जाहीर

मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पंधरा दिवस झालेले नारायण राणे मंगळवारी आपली भूमिका जाहीर करणार आहेत. पंधरा दिवसांपूर्वी राणेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. 

Aug 1, 2014, 07:36 PM IST