congress

राष्ट्रवादीची मागणी काँग्रेसने पुन्हा फेटाळली

राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त जागांची मागणी काँग्रेसनं आज पुन्हा एकदा फेटाळली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केवळ जागांची अदलाबदली होऊ शकते असं म्हटलंय. 

Jul 30, 2014, 08:51 AM IST

आठवडा उलटला, राणेंच्या राजीनाम्याचं काय?

मंत्री पदाचा राजीनामा देउन एक आठवडा उलटला तरी काँग्रेसनं नारायण राणे यांच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

Jul 28, 2014, 02:00 PM IST

मलिकांना न हटविल्यास रस्त्यावर उतरू - सेना, काँग्रेसवर भाजपची टीका

महाराष्ट्र सदन नित्कृष्ट जेवण प्रकरणी निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्यावर कारवाई झाली नाही तर शिवसेना पुन्हा रस्त्यावर उतरेल अशा इशारा खासदार राजन विचारे यांनी दिलाय. तर दुसरीकडे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी काँग्रेसवर जोरदार प्रतिहल्ला चढवलाय.

Jul 26, 2014, 07:38 PM IST

सीएम, माणिकरावांना रजनी पाटील यांचे खडे बोल

काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय बैठकीत काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांनी नेत्यांना खडे बोल सुनावले. नेत्यांची भाषणं सुरु असताना महिलांना भाषणांची संधी न दिल्यानं रजनी पाटील यांचा पारा चांगलाच चढला.

Jul 26, 2014, 07:22 PM IST

राष्ट्रवादीची शनिवारी भूमिका जाहीर करू - तटकरे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीची मागणी फेटाळ्यानंतर राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत शनिवारी आमचा निर्णय घेऊ, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

Jul 24, 2014, 06:04 PM IST

काँग्रेसनं धुडकावली राष्ट्रवादीची मागणी, जागा वाटपाचा तिढा

राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी काँग्रेसनं धुडकावली आहे. राष्ट्रवादीचा प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे, असे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान १४४ जागांवर राष्ट्रवादी ठाम आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा कायम दिसत आहे.

Jul 24, 2014, 05:33 PM IST

राष्ट्रवादीची 144 जागांची मागणी काँग्रेसनं धुडकावली

जागावाटपावरुन काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाहीर शाब्दीक चकमक सुरू असताना याच मुद्द्यावरुन दोन्ही पक्षाच्या समन्वय समितीची बैठक काल रात्री उशीरा मुंबईत पार पडली. 

Jul 24, 2014, 10:10 AM IST

ब्लॉग: नारायण राणेंचं 'बंड' ते 'बंड'!

ऋषी देसाई - नारायण राणे यांनी जाहिर केल्याप्रमाणे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. खरंतर मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा आणि काँग्रेसच्या गोटातलं समशीतोष्ण राजकारण या सगळ्यामुळं राणे एकटे पडले. राणेंच्या नाराजीला अनेक कारणं आहेत.. काही राणेंनी स्वतःहून ओढवून घेतलीत, तर काही परिस्थितीनं...

Jul 23, 2014, 08:10 PM IST

विधानसभेसाठी अर्ध्या जागा द्या... नाहीतर...!

जागावाटपाबाबत राष्ट्रवादीचा मान राखावा अन्यथा आणखी एक चांगला मित्र गमावण्याची वेळ काँग्रेसवर येईल असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीनं काँग्रेसला दिलाय. 

Jul 22, 2014, 05:11 PM IST

काँग्रेससाठी 2014 संकटाचं वर्ष, बंडाळी कशी थांबवणार काँग्रेस?

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या काँग्रेसला आता बंडाळीनं ग्रासलयं. महाराष्ट्र, आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये राजीनामा सत्र सुरु झालयं. आता यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे पडलाय.

Jul 22, 2014, 03:03 PM IST

राणेंसाठी भाजप नेते अनुकूल?

नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत कोकणातले भाजप नेते अनुकूल असल्याची चर्चा आहे. आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींच्या कानी घातली आहे. राणेंबाबत पक्षाचं नेतृत्व निर्णय घेईल, असं विधान भाजपचे कोकण प्रभारी विनय नातू यांनी केलंय.

Jul 21, 2014, 06:15 PM IST