congress

कलमाडींचा 'बागूल'बुवा

काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांच्या दालनात आजही कलमाडींचा फोटो जसाच्या तसा आहे. कलमाडींवर घोटाळ्याचे आरोप असले तरी ते सिद्ध झाले नसल्यानं त्यांच्या फोटो कायम ठेवणार असल्याचं समर्थक सांगतात.

Nov 24, 2011, 07:07 AM IST

पनवेलमध्ये काँग्रेसविरूद्ध महायुती

पनवेल नगरपालिकेच्या ३८ जागांसाठी काँग्रेस विरूद्ध शेकाप-शिवसेना आणि रिपाइं यांच्या महायुतीत थेट लढत अपेक्षित आहे. काँग्रेसनं शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरले.

Nov 23, 2011, 05:03 AM IST

अजित पवारांना आता संजय राऊतांचा टोला

क्रिकेटवर प्रेम आहे म्हणून लगेच क्रिकेट बोर्डावर जाण्याची गरज काय ? बाळासाहेब, उद्धव ठाकरेसुद्धा क्रिकेटवर प्रेम करतात. पण, म्हणून लगेच ते क्रिकेट बोर्डावर जाऊन बसले नाहीत. तिथं काँग्रेसचीच लोकं दिसतात.असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Nov 21, 2011, 10:24 AM IST

स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

राज्यात लवकरच 10 महापालिका, 27 जिल्हा परिषद, 309 पंचायत समित्या आणि 198 नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासंदर्भात विचार करण्यासाठी आयोजीत करण्यात आलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवणार. दोन्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा. येत्या बुधवारी होणार औपचारिक घोषणा.
भाजपा शिवसेना आणि रामदास आठवलेंची रिपाईने काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर कडवं आव्हान उभं केलं आहे. नुकत्याच झालेल्या खडकवासला पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभवाचा झटका बसला. खडकवासल्याची पोटनिवडणुक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली होती. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. पण हर्षदा वांजळेंना भाजपाच्या भीमराव तापकीरांकडून पराभवाचा सामना करावा लागला.
तसंच गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांचे उस आणि कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून सुरु झालेल्या आंदोलनाने तीव्र स्वरुप धारण केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारची पाचावर धारण बसली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खासदार राजू शेट्टींनी थेट पवारांच्या बारामतीतच उपोषण करुन सरकारला जेरीस आणलं. मनसेनेही शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याआधी अण्णा हजारेंच्या आंदोलनाने केंद्र सरकारच्या तोंडाला फेस आणला होता.
या पार्श्वभूमीवर मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी केली नाही तर पानीपत निश्चितच होईल हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला चांगलचं माहित आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकांना एकत्र सामोरं जाण्याचा निर्णय झाला आहे.

Nov 19, 2011, 04:43 PM IST

राहुल वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज

उत्तर प्रदेशातल्या लोकांनी महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार, या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Nov 15, 2011, 09:08 AM IST

माणिकरावांना दादांचा ' दे धक्का'

माणिकराव ठाकरे यांना 'दे धक्का'. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना राष्ट्रवादीनं त्यांच्याच यवतमाळ जिल्ह्यात दे धक्का दिला. यवतमाळमध्ये आज काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Nov 14, 2011, 11:22 AM IST

यवतमाळात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये घमासान

यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसचे अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा हा जिल्हा असल्यानं यात कुरघोडीचे राजकारण आहे. त्यामुळं संतापलेल्या माणिकरावांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

Nov 13, 2011, 03:16 PM IST

जोगींचा भाजपावर हल्लाबोल

छत्तीसगढमधील २०,००० मुलींना गेल्या आठ वर्षात देहव्यापारासाठी दिल्ली, मुंबई, बंगलोर आणि चेन्नईत विकण्यात आल्याचा सनसनाटी दावा काँग्रेसचे नेते अजीत जोगी यांनी केला.

Nov 13, 2011, 02:56 PM IST

राणे-जाधव वादाचं लोण मलवणमध्येही !

मालवणमध्ये राणे पिता-पुत्रांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दहन केलं, तर, आता खवळलेले काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मालवणमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर मांजरेकर यांच्या घरावर राणे समर्थकांनी दगडफेक केली.

Nov 8, 2011, 12:55 PM IST

राष्ट्रवादीची वेगळ्या चुलीची भाषा

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. ज्या ठिकाणी पक्ष मजबूत आहे. त्याठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Nov 8, 2011, 07:22 AM IST

काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीचा पेट्रोल भडका

पेट्रोलच्या दरवाढीविरोधात केंद्र सरकारचे सखे सोबती असलेली राष्ट्रवादी काँग्रेसही ठाण्यात रस्त्यावर उतरली.

Nov 7, 2011, 10:04 AM IST

सिंधुदुर्गात राणेंविरोधात दंड थोपटले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे समर्थक आणि जुन्या काँग्रेसमधील वाद पुन्हा उफाळून आलाय.

Nov 7, 2011, 07:13 AM IST

सदाशिवराव मंडलिक होणार काँग्रेसवासी

कोल्हापूरचे अपक्ष खासदार सदाशिवराव मंडलिक २१ ऑक्टोबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Nov 5, 2011, 01:27 PM IST

राहुल गांधींकडे कार्यकारी अध्यक्षपद?

काँग्रेसचे रचिटणीस राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे कार्यकारी अध्यक्षपद सोपविले जाण्याची शक्यता अधिक आहे. तशी जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय पटलावर सुरु आहे.

Nov 3, 2011, 06:07 AM IST

अण्णांचा काँग्रेसविरोध मावळला!

हिसारमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसविरोधी प्रचार करण्यावरून झालेले मतभेद आणि टीकेनंतर अण्णा हजारेंनी पाच राज्यात होणा-या अगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचं नाव न घेता प्रचार करण्याचं ठरवलंय.

Nov 1, 2011, 09:23 AM IST