congress

आघाडीसाठी बैठीकींच्या फैरीवर फैरी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून आघाडीबाबत काहीच ठरताना दिसत नाहीये. त्यामुळे गेले अनेक दिवस बैठकींच्या फैरी सुरू आहेत. त्यामुळे बैठकीत आजच्या बैठकीत काय घडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Jan 8, 2012, 05:03 PM IST

पवारांचा काँग्रेसला आघाडी बाबत निर्वाणीचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस आता आघाडी करण्याबाबत आक्रमक झाली आहे. आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादीनं काँग्रेसला आता अल्टिमेटम दिला आहे. आघाडीचा निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत घ्या असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला दिला.

Jan 8, 2012, 03:24 PM IST

आघाडीचा निर्णय लांबणीवर

संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुनच सोमवारी आघाडीचा निर्णय घेण्यावर एकमत झालं आहे.

Jan 8, 2012, 12:13 AM IST

काँग्रेसला 'गुरु' मंत्र, आघाडी नको!

आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करू नये यासाठी उत्तर मध्य मुंबईचे खासदार गुरुदास कामत आक्रमक झालेत. त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांना जागावाटपासाठी २००७ सारखी एक बैठक बोलावण्याचे आदेश दिलेत

Jan 7, 2012, 12:02 PM IST

आघाडीसाठी दोन्ही काँग्रेसच्या ‘जोर बैठका’!

मुंबई महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी संदर्भातील आज सकाळी झालेली बैठक तोडग्या विना संपली. सायंकाळी पुन्हा दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन वार्ड निहाय आढावा घेणार असल्याची माहिती झी २४ तासला दोन्ही पक्षातील सूत्रांनी दिले.

Jan 7, 2012, 07:36 AM IST

कामातांचा आघाडीत खोडा

का करावी. काँग्रेस एकट्याने लढून सत्ता आणण्यास समर्थ आहे, राष्ट्रवादी मागे फरफट नको, असा विरोध मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी व्यक्त केला आहे.

Jan 6, 2012, 08:14 PM IST

पुण्यात राष्ट्रवादीचा एकलो चलोचा नारा

www.24taas.com - पुण्यात काँग्रेस बरोबर आघाडीची शक्यता नसल्याचं स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत. पिंपरी-चिंचवडनंतर पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

Jan 4, 2012, 02:32 PM IST

'इंदिरा भवन'वरून काँग्रेस- ममतामध्ये रण

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी इंदिरा भवनचं नाव बदलण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे, त्यावरून आता काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे.

Jan 3, 2012, 10:15 PM IST

काँग्रेस ‘टार्गेट’ची भूमिका चुकीची

हरिश्य रोग्ये

प्रशांत भूषण हे सहज ओघात बोलले तर समजू शकलो असतो. परंतु ते पुन्हा जाणीवपूर्वक बोलून चूक करतात, याला काय म्हणायचं? ‘टीम अण्णां’च्या कोअर कमिटीने त्यांच्या विधानाचा निषेध केलेला नाही. केवळ अण्णा हजारे हे कॉंग्रेसलाच ‘टार्गेट’ करत आहेत.

Dec 28, 2011, 03:52 PM IST

मुस्लिम आरक्षणाचा सरकारी डाव

उत्तर प्रदेशात निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी सरकारी नोकऱ्यांत मुस्लिमांना आरक्षण देऊन काँग्रेसनं हुकुमाचा पत्ता फेकलाय. केंद्रीय मंत्रिमंडळानं ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणात मुस्लिमांना साडेचार टक्क्यांचं आरक्षण देण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर राजकारणही तापू लागलंय.

Dec 23, 2011, 07:40 PM IST

अण्णांना आव्हाडांची 'थप्पड'

नगरपालिका निवडणुकीत अण्णा फॅक्टर चालला नसल्याचे वक्तव्य माणिकराव ठाकरेंनी केलं होतं. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विधानभवन परिसरात मतदारांनी अण्णांच्या श्रीमुखात भडकावली. अशा आशयाचे पोस्टर घेऊन आले होते.

Dec 15, 2011, 04:34 PM IST

प्रगतीपुस्तक 'जोत्स्ना दिघें'चं

राजकिय गुरू जयवंत परबाना आव्हान देत जोत्स्ना दिघेंनी मतदारापुढे विकासकामावरच मत मागण्याचा निर्णय घेतलाय.विकासकामाच्या प्रगतीपुस्तकावरच जनता मला पुन्हा निवडून आणेल असा दावा जोत्स्ना दिघेंनी केलाय.

Dec 15, 2011, 12:56 PM IST

निवडणुकीची धुमशान

राज्यात नगरपालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि विरोधकांनी मरगळ झटकली. कारण वाढती महागाई, अण्णा फॅक्टर यामुळे कॉंग्रेस आघाडी बॅकफूटवर जाणार अस वाटत होतं. पण आता निवडणूक निकालानंतर वेगळं चित्र समोर आलं.

Dec 15, 2011, 11:24 AM IST

राष्ट्रवादीची कर्नाटकात मुसंडी?

महाराष्ट्रात घोडदौड करणारी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता कर्नाटकात काँग्रेसला धोबीपछाड देण्याची चिन्हं आहेत. कर्नाटकात काँग्रेसचे १५ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असून लवकरच ते शरद पवारांची भेट घेणार आहेत. चिक्कोडीचे आमदार प्रकाश हुक्केरी यांनी झी २४ तासला ही माहिती दिली आहे.

Dec 14, 2011, 11:06 AM IST