congress

सेनेनं मुंबई, ठाणे 'जिंकून दाखवलं'

मुंबई महापालिकेवर गेली १७ वर्षे फडकणारा शिवसेना-भाजप युतीचा भगवा पुन्हा एकदा फडकणार आहे. शिवसेनेच्या करून दाखवलंची टिंगल केली होती. मात्र, सेनेने जे काही करून दाखवलं त्याच्याच जीवावर पुन्हा मुंबई,ठाणे पालिका जिंकून दाखवली.

Feb 18, 2012, 01:18 PM IST

अविनाश बागवेंना पोलिसांची धक्काबुक्की

पुण्यात काँग्रेसचे उमेदवार अविनाश बागवे यांनी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार केली आहे. कासेवाडीतल्या प्रभाग क्र.६० मध्ये हा प्रकार घडला. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र आहेत.

Feb 16, 2012, 01:38 PM IST

काँग्रेसची नाती, भाजपला मुद्दे !

गोव्यात सात वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांनी विधानसभेसाठी त्यांच्याच कुटुंबियांना उमेदवारी वाटून घेतली आहे आणि हा मुद्दा लावून धरत विरोधी पक्षाने रान उठवल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

Feb 15, 2012, 04:07 PM IST

राष्ट्रवादीच्या रॅलीवर दगडफेक

नाशिकमधल्या सातपूर परीसरातील शिवाजीनगर भागात राष्ट्रवादीच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे.

Feb 11, 2012, 04:40 PM IST

नागपूरमध्ये नात्यांचे 'महाभारत' !

नागपूरमध्ये सर्वच पक्षांनी नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांनाच तिकीटं वाटली आहेत. आई- वडील अपक्ष तर मुलगा मनसेकडून, काका विरुद्ध पुतण्या, काका विरुद्ध पुतणी अशाही लढती रंगत आहेत.

Feb 11, 2012, 03:06 PM IST

आघाडीचा आज संयुक्त जाहीरनामा

मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

Feb 8, 2012, 11:43 AM IST

माणिकरावांचं मानसिक संतुलन बिघडलंय- राठोड

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला, शिवसेना आमदार संजय राठोड यांनी लगावला आहे. मुलाला विजयी करण्यासाठी ते माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचंही राठोड यांनी म्हटलं.

Feb 8, 2012, 09:36 AM IST

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीची स्थिती

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मुंबईत शिवसेना आणि मनसेला बंडोबांना थंड करण्यात बऱ्यापैकी यश आलं. प्रतिष्ठेच्या रवींद्र नाट्य मंदीर वॉर्ड मधून भरत राऊत आणि संजय भरणकर यांचे बंड थोपवण्यात शिवसेनेला यश आलं.

Feb 4, 2012, 10:26 PM IST

काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा गोंधळ

महापालिका निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाचा फटका नेत्यांना बसला. एबी फॉर्मवरून महिला कार्यकर्त्या संतापल्या होत्या. त्याचा फटका सरचिटणीस आणि स्थानिक खासदार विलास मुत्तेमवारांना बसला.

Feb 4, 2012, 07:08 PM IST

'माणिकराव ठाकरे, विजय दर्डा पक्षाला कलंक'

ज्येष्ठ विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुतराव धोटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खासदार विजय दर्डा यांच्यावर आरोप केलेत. हे दोन्ही नेते पक्षाला कलंक असून पक्षाच्या नावाचा गैरवापर करुन अब्जावधींची संपत्ती जमवल्याचा घणाघाती आरोप धोटे यांनी केला. यवतमाळमध्ये बोलताना जांबुतराव धोटे यांनी हा आरोप केला.

Feb 4, 2012, 12:11 PM IST

'जाऊ बाई' जोरात !

सांगली जिल्ह्यातल्या येळावी गटातून दोन सख्या जावा एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत. ज्येष्ट नेते विश्वास पाटील यांची मोठी सून तेजस्विनी पाटील या काँग्रेसकडून रिंगणात आहेत.

Feb 3, 2012, 10:37 PM IST

काँग्रेस बॅकफूटवर !

मुंबईची सलग सत्ता उपभोगणाऱ्या य़ुतीला खाली खेचण्याची कॉंग्रेसने पूर्ण तयारी केली होती. पण काँग्रेसच्याच अजित सावंतानी बंड करत थेट काँग्रेसच्या तिकीटवाटपातला घोळ मुंबईसमोर आणला.

Feb 3, 2012, 12:53 PM IST

ठाण्यात तिकीटांचा 'नातीखेळ'

महापालिका निवडणुकीत कुणी मुलाला तिकीट दिलंय, कुणी पत्नीला, कुणी भावाला किंवा अन्य कुठल्या नातेवाईकाला. ठाण्यात मात्र एकाच घरात कुठे दोन तर कुठे तीन जणांना तिकीट मिळालं आहे.

Feb 2, 2012, 10:45 PM IST

कृपाशंकर X प्रिया दत्त संघर्ष पेटलाय!

तिकीट नाकारल्यानं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात खासदार प्रिया दत्त समर्थक आक्रमक झालेत. प्रिया दत्त यांच्या ऑफिससमोर समर्थक कृपाशंकर सिंहविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने करतायत.

Feb 2, 2012, 07:15 PM IST

काँग्रेसच्या तिकीटवाटपावर प्रिया दत्त नाराज

तिकीटवाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजी वाढत आहे. मुंबईतल्या तिकीटवाटपावरुन उत्तर मध्य मुंबईच्या खासदार प्रिया दत्त या नाराज झाल्या आहेत. उत्तर मुंबईत झालेल्या तिकीट वाटपात मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्या मनमानीविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Feb 2, 2012, 12:00 AM IST