पत्नीला अश्लील एसएमएस पाठवल्याबद्दल मित्राची हत्या
आपल्या मित्राच्या हत्त्येप्रकरणी सुमित या २४ वर्षीय तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मित्र सुमितच्या पत्नीला अश्लील एसएमएस करत असल्यामुळे त्याचा खुन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात सुमितला अटक केली आहे .
Feb 7, 2012, 10:53 AM ISTनकली सोनं विकणारे गजाआड
शुध्द सोन्याच्या नावाखाली लोकांना गंडा घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. रतन राठोड आणि अशोक राठोड अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून १ किलो बनावट पितळी धातूची बिस्कीटं जप्त केली आहेत.
Feb 7, 2012, 08:26 AM ISTकुटुंबावर प्राणघातक हल्ला, दोघे गंभीर
मुंबईतल्या दहिसरमध्ये तीस ते चाळीस तरुणांनी धुडगूस घालत एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीय. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी संध्याकाळी वैती कुटुंबिय दहिसरच्या मुव्हिटाईम थिएटरमध्ये अग्निपथ सिनेमा पाहण्यास गेले होते. चिकनी चमेली गाणं सुरु होताच सिनेमागृहातल्या तीस ते चाळीस जणांनी अश्लिल हरकती करण्यास सुरुवात केली. वैती कुटुंबियांनी याचा विरोध केला. मात्र हाच राग मनात ठेवून सिनेमा संपल्यावर या तीस ते चाळीस तरुणांच्या समूहाने वैती यांच्या गाडीवर हल्लाबोल केला.
Feb 3, 2012, 12:04 PM ISTशशिकला यांच्या बंधुला अटक
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या माजी सहकारी शशिकला यांचे बंधू दिवाकरन यांना आज शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. एका महिलेचे घर उध्वस्त केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आले आहे.
Feb 3, 2012, 10:53 AM IST'रेल्वे' तिकीटांचा काळा बाजार!
मुंबईच्या नागपाडा परिसरातल्या एका कार्यालयावर छापा मारुन आरपीएफने १ लाख ६ हजार रुपये किमतीची १२६ रेल्वे तिकीटं जप्त केली आहेत.
Feb 2, 2012, 04:09 PM IST'बिस्कीट गँग'चा म्होरक्या गजाआड
गेल्या अनेक दिवसांपासून पुणे -मुंबई असा बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्ष केलं जात होतं. प्रवाशांना गुंगी आणणारं बिस्कीट खायला देऊन त्यांच्याकडील मौल्यवान दागिने आणि पैसे लुटले जात होतं. मात्र एका प्रवाशाच्या सतर्कतेमुळे या टोळीच्या म्होरक्या गजाआड झाला आहे.
Feb 1, 2012, 06:14 PM ISTपुण्यात लष्करी विद्यार्थ्यांची पोलिसांना मारहाण
दुचाकीसाठी बंदी असलेल्या लकडी पुलावरून सुसाट वेगाने गाडी नेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना वाहतूक पोलिसांनी अडविले. याचा राग आल्याने लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) विद्यार्थ्यांनी टिळक चौकातील संभाजी चौकीतील महिला पोलिसासह इतर दहा पोलिसांना मारहाण केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Feb 1, 2012, 10:54 AM ISTरात्रीची गुन्हेगारी रोखणार 'पोलीस मित्र'
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता 'पोलीस मित्र' असं नवं पथक तयार केलं आहे. यात कॉलेज विद्यार्थी आणि स्थानिकांचा समावेश करण्यात आला आहे.
Jan 28, 2012, 05:37 PM ISTमुलाला केलं 'किडनॅप', पोलिसांनी केलं 'ट्रॅप'
१२ वर्षांचा मुलाचं अपहरण करून पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. २३ जानेवारीला ‘एरेक फर्नांडिस’ या शाळकरी मुलाचं अपहरण अगदी फिल्मी स्टाईलमध्ये करण्यात आलं होतं.
Jan 27, 2012, 11:34 PM ISTजिल्हापरिषदेची धांदल, राष्ट्रवादीत बांदल
मंगलदास बांदल यांनी मंगळवारी अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावर रात्री साडे अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बांदल यांच्यावर २००६ मध्ये ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागासवर्गीय जमीन बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Jan 27, 2012, 10:11 PM ISTचोरांचा मैत्रीला 'शिरच्छेद'
चोरून आणलेल्या मालाच्या विभागणीवरून झालेल्या वादात एकाचं मुंडकं छाटण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. अर्जुन अलाप्पा पुजारी असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे.
Jan 27, 2012, 08:57 PM ISTकफ परेडला मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न
मुंबईतल्या कफ परेड भागातल्या दोन मुलांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. मात्र एक आरोपी फरार झाला आहे.
Jan 22, 2012, 08:42 AM ISTभावांनीच केली बहिणीची हत्या
देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीला लागूनच असणाऱ्या नॉएडामध्ये पुन्हा एकदा ऑनर किलींगची घटना घडली आहे. या घटनेत तीन भावांनी मिळून आपल्याच बहिणीची हत्या केली.
Jan 18, 2012, 03:34 PM ISTमैत्रीखातर चोरलं बाळ
अमर शर्मा नावाच्या व्यक्तीनं वाडीबंदर इथं राहणारा आपला मित्र अब्दुल्ला शेख याच्यासाठी एका लहान बाळाची चोरी केली. अब्दुल्लाला लग्नाच्या २५ वर्षांनंतरही मूल होत नसल्यानं तो दु:खी असल्याची गोष्ट त्याचा जिवलग मित्र अमर शर्माच्या लक्षात आली.
Jan 17, 2012, 10:49 AM IST