साईमंदिराच्या पार्किंग लॉटमध्ये चोरी
शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील व्हीआय़पी पार्किंगमध्ये असलेल्या टोयाटा फॉर्च्युनरच्या गाडी चालकाचं लक्ष विचलीत करुन अज्ञात चोरट्यांनी गाडीतील ८ लाख ४० हजार रोख असलेली बॅग घेऊन पोबारा केला.
Jan 16, 2012, 08:29 AM ISTखंडणीखोर पोलीस अडीच वर्षांनंतरही मोकाटच!
जिल्हा परिषदेच्या सदस्याकडून ६० लाखांची खंडणी मागून अपहरण करणारे चाळीसगावचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनोज लोहार अडीच वर्षांनंतरही मोकाटच आहेत. इतकंच नव्हे तर या प्रकरणातून अपहरणाचं कलमच काढण्यात आलं आहे.
Jan 14, 2012, 06:05 PM ISTसतीश शेट्टी हत्त्येचा अजूनही उलगडा नाहीच
पुण्यात तळेगाव दाभाडेमधल्या सतीश शेट्टी यांच्या हत्येला आज दोन वर्षं पूर्ण होत आहेत. मात्र दुर्दैवानं या हत्या प्रकरणाचा अजून उलगडा झालेला नाही. सतीश शेट्टी यांची हत्या कोणी आणि कशासाठी केली, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
Jan 13, 2012, 11:59 PM ISTगंगापूरमध्ये नगराध्यक्षांच्या घरावर हल्ला
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या घरावर अज्ञात समाजकंटकांनी हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी संजय जाधव यांना मारहाण केली आहे. शिवाय त्यांच्या घराची तोडफोडही करण्यात आली.
Jan 13, 2012, 04:00 PM ISTनाशिकमधील वाढती गुन्हेगारी
देवभूमी, मंत्रभूमी, यंत्रभूमी अशी नाशिक जिल्ह्याची ही ओळख साऱ्या जगानं मान्य केली आहे. महाराष्ट्राचे देवघर असं संतसाहित्यिकानी वर्णन केलेल्या नाशिकची ओळख आता बदलत आहे. देवभूमीत आता दानवांचा संचार झाला आहे आणि याच दानवाचे जे काही प्रताप आहेत ते पाहून कुणाचाही संताप होईल. ही कृष्णकृत्य आहेत नाशिकच्या नराधम गुन्हेगांराची.
Jan 11, 2012, 12:24 AM ISTचोर समजून निष्पापांची हत्या
चोर समजून ग्रामस्थांनी दोन इसमांना चोप दिला. ही दुर्घटना बोईसरच्या गुंदले गावात घडली असून ग्रामस्थांनी केलेल्या या हल्ल्यात दोन ड्रायव्हर जागीच ठार झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १० ते १२ ग्रामस्थांना ताब्यात घेतलं आहे.
Jan 6, 2012, 11:14 PM ISTमित्रांनीच केला कॉलेज तरुणाचा खून
विरारच्या विठूरमाळी भागात राहणाऱ्या हितेश झा या कॉलेज तरूणाचा त्याच्या पाच मित्रांनीच जुन्या भांडणातून बळी घेतला. त्यातल्या चंदन या मित्रानं खुनाची कबुली दिल्यानं या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. यातले उरलेले चारही आरोपी फरार आहेत.
Jan 6, 2012, 07:46 PM ISTचीनमध्ये शिक्षा, हिरे व्यापारी मुंबईत
तस्करीच्या आरोपावरून चीनमध्ये गेले दोन वर्षे शिक्षा भोगत असलेले १२ भारतीय हिरे व्यापाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. या हिरे व्यापाऱ्याचे गुरुवारी रात्री उशिरा भारतात आगमन झाले. त्यांचे मुंबई विमातळावर स्वागत करण्यात आले.
Jan 6, 2012, 12:11 PM ISTकराची गोळीबारात ५ ठार
पाकिस्तानमधील कराची शहरामध्ये आज शुक्रवारी झालेल्या गोळीबारात पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. दोन ठिकाणी गोळीबारीच्या घटना घडल्या.
Jan 6, 2012, 11:14 AM ISTउत्तर मेक्सिकोत ३१ ठार
उत्तर मेक्सिकोमधील तामाउलीपस येथील कारागृहात विल्डिंग निव्हज आणि होममेज वेपन्स या दोन गटांमधील कैद्यांमध्ये बुधवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. यात ३१ जण ठार झालेत.
Jan 5, 2012, 01:18 PM ISTनायजेरियन ठगांना जेलची 'लॉटरी'
मुंबई पोलीस क्राईम ब्रांचच्या युनिट सातनं नायजेरियन टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट पासपोर्ट, लाखो रुपयांची रोकड, बोगस सर्टिफिकेट्स, लॅपटॉप तसंच इतर साहित्य जप्त केलंय.
Jan 3, 2012, 06:52 PM ISTउत्तर प्रदेशात शस्त्रास्त्रे जप्त
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे पोलिसांनी आज अज्ञाताकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला आहे. विधानसभा निवडणुकीत घातपात करण्याच्या उद्देशाने ही शस्त्रास्त्र आणली गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Jan 3, 2012, 02:00 PM ISTराजगुरुनगरमध्ये भर दिवसा हत्या
पुण्यातल्या राजगुरुनगरचे उपसरपंच सचिन भंडलकर यांची हत्या करण्यात आलीय. अज्ञात इसमांनी त्यांच्यावर तलवारीनं वार केले. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 1, 2012, 02:13 PM ISTधुळे अपघातात ५ ठार ८ जखमी
धुळ्यातील अपघातात ५ ठार झालेत. हा अपघात मुंबई - आग्रा महामार्गावर सरवड फाट्याजवळ आज पहाटे झाला. ट्रक- टेम्पो- सुमो या तीन वाहनांमध्ये धडक झाली. अपघातात ८ जखमींपैकी ३ जण गंभीर आहेत.
Dec 31, 2011, 01:36 PM ISTपाक स्फोटात १५ ठार
पाकिस्तानातील क्वेटा शहरामध्ये शुक्रवारी सायंकाळी झालेल्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी झाले आहेत.
Dec 31, 2011, 12:51 PM IST